आजकाल वाढदिवस साजरा करणे असो वा कोणताही आंनदाचा क्षण आपल्यापैकी अनेकजण पिझ्झा मागवून पार्टी करत असतात. मात्र बाजारात मिळणाऱ्या पिझ्झाचा बेस नेहमीच रिफाइंड मैद्यापासून बनवला जातो. म्हणूनच काही फिटनेस व डाएट करणारी लोकं असा पिझ्झा अनहेल्दी मानतात. कारण मैदा बेस पिझ्झा जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढते. ग्लूटेनची समस्या असलेल्या लोकांना पिझ्झा खाल्यास समस्या निर्माण होतात. या लेखात आपण ग्लूटेन-मुक्त पिझ्झाची रेसिपी जाणून घेणार आहोत, म्हणजे आपण त्याच्या बेसमध्ये रिफाइंड मैदा किंवा रवा वापरणार नाही. शिवाय तुम्ही घरीच स्वतः सॉस तयार करूनहा पिझ्झा बनवू शकतात, जो फायबर आणि प्रथिने समृद्ध आहे.
पिझ्झा बेसचे साहित्य
तुम्हाला पिझ्झा बेस बनवण्यासाठी 300 ग्रॅम रताळे आणि 1 कप ओट्स किंवा त्याचे पीठ, त्याशिवाय तुम्हाला बेकिंग पेपर लागेल.
मखनी सॉसचे साहित्य
1 चमचा ऑलिव्ह ऑइल, 4-5 लसूण पाकळ्या, समान प्रमाणात आले, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो आणि 1 लाल मिरची, चवीनुसार मीठ, 80 ग्रॅम कमी फॅटयुक्त पनीर.
टॉपिंग साठी लागणारे साहित्य
पिझ्झा टॉपिंग करण्यासाठी 1 चमचा तेल, मूठभर स्वीट कॉर्नचे दाणे, 100 ते 120 ग्रॅम पनीर, काही पेरी पेरी मसाला (किंवा तुमच्या आवडीचा कोणताही मसाला), ओवा आणि लाल मिरचीचे तुकडे आणि सुमारे 30 ग्रॅम कमी फॅटयुक्त मोझारेला चीज घ्या.
फायबर आणि प्रथिने समृद्ध पिझ्झा बनवण्याची रेसिपी
एका पॅनमध्ये थोडे तेल टाका आणि त्यात पनीर, कॉर्न, थोडे मीठ आणि पेरी-पेरी मसाला टाकून सर्व मिश्रण एकजीव करा.
एका भांड्यात अर्धा चमचा तेल टाका. आता या तेलात लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, टोमॅटो, मीठ, सुक्या तिखट आणि थोडे पाणी टाका आणि झाकण ठेवून शिजवून घ्या.
टोमॅटो शिजले की ते मिश्रण बाहेर काढून थोडंस थंड करा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले मिश्रण टाकून त्यात पनीर टाका आणि थोडे पाणी मिक्स करून वाटून घ्या जेणेकरून घट्ट पेस्ट तयार होईल.
आता एका भांड्यात रताळी उकडून घ्या आणि थंड करा. थंड झाल्यावर रताळी सोलून घ्या आणि चांगले मॅश करा.
रताळे मॅश केल्यानंतर तुम्हाला त्यात ओट्सचे पीठ मिक्स करून मळून घ्या आणि बेस तयार करा.
तयार पीठ बेकिंग पेपरवर पसरवून त्याचा गोलाकार बेस तयार करा. तयार तयार केलेला सॉसचा थर बेसवर लावा.
सॉसचा पुर्णपणे बेसवर लावल्यानंतर त्यावर कॉर्न-चीज टॉपिंग पसरवा आणि त्यावर मोझरेला चीज टाका.
आता तुम्हाला त्यावर ओरेगॅनो आणि मिरचीचे तुकडे असे काही मसाले टाकावे लागतील किंवा तुमच्या आवडीचे मिक्स हर्ब्स देखील तुम्ही टाकू शकता.
जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर पिझ्झा 180 अंशांवर सुमारे 15 मिनिटे पिझ्झा बेक करा. तुमचा पिझ्झा तयार होईल.
ओव्हनशिवाय पिझ्झा कसा बेक करायचा?
जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर एक तवा गरम करा. त्यावर मीठाचा जाड थर पसरवा. त्यावर एक स्टँड ठेवा, बेकिंग पेपरसह पिझ्झा ठेवा आणि 20 ते 25 मिनिटे बेक करा. जर तुम्ही पिझ्झा प्रेमी असाल पण हेल्दी पदार्थ खाण्याला पसंती देत असाल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




