त्यांनी मला विचारले, ‘तू कॉफी घेणार की चहा?’ मी उत्तर दिले, ‘मला कॉफी जास्त आवडते.’ त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि चहा घेऊन आल्या. मी हसलो. काहीतरी गडबड झाली असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी चिंतेत विचारले, ‘चांगला झाला नाही का?’ मी खात्रीने सांगितले, ‘खूप छान आहे. मला चहा आवडतो, विशेषतः तुम्ही बनवलेला.’ हे ऐकून त्या सहज झाल्या आणि चहा प्यायला बसल्या. मी लहानपणापासून या मावशींना ओळखतो. त्या माझ्या आईच्या सर्वात जवळच्या मैत्रीण आणि वडिलांच्या सर्वात चांगल्या मित्राच्या पत्नी होत्या. नागपूरच्या संगम चाळीत आम्ही शेजारी होतो. आमच्या घरांआड एकच भिंत होती. ती कॉलनी आज अस्तित्वात नाही. मग त्यांनी विचारले, ‘तुझ्यासोबत घरी कोण राहतं?’ मला संपूर्ण कहाणी पुन्हा सांगावी लागली की, त्यांची लाडकी मैत्रीण, माझी आई खूप आधीच वारली. माझ्या मुलीचे लग्न झाले आणि आता घरात फक्त मी आणि माझी पत्नी राहतो. जर माझे उत्तर फक्त ‘मी आणि माझी पत्नी’ असे असते तर त्यांनी नक्कीच पुढचा प्रश्न विचारला असता की, ‘तुझ्या आई-वडिलांना काय झाले?’ मी जेव्हाही भोपाळला जातो तेव्हा कमला सुंदरेसन मावशींना नक्की भेटतो. या ऑक्टोबरमध्ये त्या 86 वर्षांच्या होतील. गेल्या 45 वर्षांपासून त्या भोपाळच्या 1100 क्वार्टर्स येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरासमोरील गल्लीत राहतात. या भेटींचे आंबट-गोड सौंदर्य असे की, मी कोण आहे हे आता त्यांना आठवत नाही. तरीही मी त्यांना 66 वर्षांपासून ओळखतो. लहानपणी त्या मला भरवायच्या आणि आईसोबत माझी काळजी घ्यायच्या. असे असूनही त्यांना माझे नावदेखील आठवत नाही. गेल्या रविवारी मी दोन तास त्यांच्यासोबत बसलो आणि त्यांनी एकदाही माझे नाव घेतले नाही. जेव्हा त्यांचा दत्तक मुलगा राहुलने मला ओळखण्यासाठी गमतीने त्यांना विचारले तेव्हा त्या हसल्या आणि म्हणाल्या, ‘यांना कोण ओळखत नाही?’ त्यांच्यासोबत घालवलेल्या वेळेमुळे मला जपानच्या ‘रेस्टॉरंट ऑफ मिस्टेकन ऑर्डर्स’ची आठवण आली. हा एक अनोखा सोशल पॉप-अप आहे, ज्याच्या संपूर्ण वेट-स्टाफमध्ये स्मृतिभ्रंशासह जगणारे लोक आहेत. पॉप-अपचा अर्थ असा की, हे कायमस्वरूपी रेस्टॉरंट नसून टोकियो, क्योटो आणि शिझुओकासारख्या शहरांमध्ये काही काळासाठी सुरू केले जाते. ग्राहकांना माहीत असते की, तिथे जवळपास 40% ऑर्डर चुकीच्या येऊ शकतात. तरीही ते जातात. कारण तिथे आपलेपणा, स्वीकार्यता आणि हलक्या-फुलक्या मनोरंजनाचे वातावरण असते. 2017 मध्ये टीव्ही दिग्दर्शक शिरो ओगुनी यांनी याची स्थापना केली होती. स्मृतिभ्रशाबाबत पूर्वग्रह मोडून काढणे आणि या आजारासोबत जगणारे लोकही समाजाचे सक्रिय व सक्षम सदस्य आहेत, हे दाखवणे हा यामागचा उद्देश आहे. तिथे लोकांना यासाठी प्रोत्साहित केले जाते की, जर ऑर्डर चुकीची आली तर नाराज होण्याऐवजी जे टेबलवर आले आहे त्याचा आनंद घ्यावा. तिथली डायनिंग रूम सखोल मानवतेने भरलेली आहे. स्टाफसाठी हा संवाद मिसळण्याची संधी देतो, एकटेपणा कमी करतो आणि जीवनातील उद्देशाची जाणीव करून देतो. मावशी आता फक्त जुन्या साड्याच नेसतात. त्यांना विचारले की नवीन साड्यांचे काय करणार? तर त्या म्हणतात, ‘मला यात आराम मिळतो.’ त्या आपली प्लेट धुण्यासाठी बाथरूममध्ये जातात. कारण त्यांना कित्येक दशकांपूर्वी संगम चाळीच्या मागच्या अंगणात प्लेट धुणे आठवते. त्या प्रत्येक मोलकरणीवर आरोप करतात की, त्या उभ्या राहून वेळ वाया घालवत आहेत, काम करत नाहीत. दुसरीकडे, राहुलने त्या सर्वांना सूचना दिल्या आहेत की, मावशीवर लक्ष ठेवा आणि त्यांना सोबत द्या, जेणेकरून त्यांना एकटेपणा जाणवणार नाही. यामुळेच आपण स्मृतिभ्रंशाशी झुंजणाऱ्या आपल्या प्रियजनांच्या भेटीला ‘काय फायदा? ते आपल्याला ओळखतही नाहीत’ असे म्हणून टाळता कामा नये. आपण त्यांना भेटायला गेले पाहिजे. कारण ‘आपण त्यांना ओळखतो.’ फंडा असा की, आपल्या वैयक्तिक ‘कॅफे ऑफ मिस्टेकन ऑर्डर्स’मध्ये (स्मृतिभ्रंशाने ग्रस्त कोणत्याही ओळखीच्या व्यक्तीकडे नक्की जा.) तिथे मिळणारी डिश, ड्रिंक आणि संवाद कदाचित तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसतील, पण तिथे गेल्याने तुमच्या मनाला नक्कीच समाधान मिळेल.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




