दोन वर्षांपूर्वी वडील आणि दोन भावंडांच्या निधनानंतर मेक्सिकन खानावळ चालवणारे रेमे जिमेनेझ लॉस एंजेलिसला राहायला गेले. त्यांच्या आईला आधाराची गरज होती. म्हणून रेमे यांनी त्यांच्यासोबत एक कॅफे सुरू करण्याचा विचार केला. तथापि, वाढता खर्च आणि खाण्याच्या परवान्यांच्या असंख्य औपचारिकतांमुळे अमेरिकेत व्यवसाय सुरू करणे अशक्य झाले. त्यांनी फुटपाथवर स्नॅक्स विकायला सुरुवात केली. पण स्थानिक महानगरपालिकेने ते बंद केले. हा प्रकार 2024 पर्यंत सुरू होता. मात्र, त्याच वर्षी एका नवीन प्रादेशिक कायद्याने घरगुती स्वयंपाकघरांना परवानगी दिली. या उपक्रमाला काही मर्यादा आहेत. एक कंपनी दररोज 30 पेक्षा जास्त प्लेट्स विकू शकत नाही. वार्षिक महसूल 1,00,000डॉलरपेक्षा जास्त असू शकत नाही, जी तेथील एका नवीन तंत्रज्ञान कर्मचाऱ्यासाठी उदरनिर्वाहाकरिता एक वाजवी रक्कम आहे. परवान्याची किंमत 597डॉलर निश्चित करण्यात आली होती, परंतु लोकांना ही संकल्पना स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पहिल्या काही शंभर लोकांसाठी ती माफ करण्यात आली. सुरुवातीला लोक घरातून स्वयंपाकघर सुरू करण्यास संकोच करत होते. पण रेमेसारख्या लोकांनी ही संधी साधली आणि लवकरच 320 परवाने जारी करण्यात आले. सध्या शहर प्रशासनाकडे अशा आणखी 470 व्यवसायांना आधार देण्यासाठी पुरेसे भांडवल आहे. 30 जूनपर्यंत घरगुती केटरिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी कुणालाही शुल्क भरावे लागणार नाही. परवान्यासाठी दोन खाद्य कामगार प्रमाणपत्रे, काही स्वच्छता तपासण्या आणि एक मूल्यांकन आवश्यक आहे. परंतु, देशात कुठेही खाण्याचे ठिकाण उघडण्यासाठी आवश्यक असलेल्या असंख्य राज्य आणि स्थानिक परवानग्यांच्या तुलनेत हे खूपच कमी आहे. ही केवळ एका व्यक्तीची किंवा काही शेकडो कुटुंबांची गोष्ट नाही. अमेरिकेत घरगुती स्वयंपाकघर हा एक नवीन ट्रेंड असला तरी तो मेक्सिको, भारत आणि अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये प्रचलित आहे. तिथे रोजगाराच्या संधी दुर्मिळ असल्याने, ते या कल्पनेला प्रोत्साहन देतात. जगभरातील अनेक शहरी स्थानिक सरकारे अशाच प्रकारची धोरणे विकसित करत आहेत. जेव्हा नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकत नाहीत, तेव्हा ते स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देतात, जसे की ओला आणि उबरसारख्या ॲप्सना मान्यता देणे. केटरिंग व्यवसायातही, ते अशा लोकांना एकत्र आणून तेच करत आहेत, ज्यांच्याकडे काही खोल्या आहेत, स्वयंपाकाचे चांगले कौशल्य आहे आणि जे परवडणाऱ्या किमतीत जेवण देऊ शकतात. यामुळे दोन उद्दिष्टे साध्य होतात: समाजातील भुकेल्यांना चांगले आणि स्वस्त अन्न मिळते. शिवाय, लोकसंख्येचा एक भाग व्यग्र आणि उत्पादक राहतो, ज्यामुळे त्यांना स्थानिक अधिकाऱ्यांशी संघर्ष करण्याची गरज भासत नाही. असे नाही की इतर देशांतील लोक हे करत नाहीत. येथील अनेक घरांमध्ये परवानगीशिवाय स्वयंपाकघरेसुद्धा आहेत. हा संपूर्ण प्रकल्प कुटुंबाद्वारे व्यवस्थापित केला जातो. रस्त्यांवर खाद्यपदार्थांच्या गाड्यांची वाहतूक नसते आणि जेवणानंतर परिसरात कोणताही पसारा होत नाही. हा व्यवसाय आमच्यासाठी नवीन नाही, कारण आम्ही ‘घरामागे, दुकानापुढे’ हा दृष्टिकोन जाणतो आणि त्याचे पालन करतो. हळूहळू श्रीमंतांनी त्याचे रूपांतर ‘वर घर, खाली दुकान’ यात केले. पण भविष्यात हे बदलणार आहे, जेव्हा ‘तुमचे घरच तुमचे दुकान’ असेल. हे केवळ गावांमध्येच नाही, तर श्रीमंत देशांच्या गर्दीच्या महानगरांमध्येही घडेल, कारण लहान व्यवसायांना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी योजना वेगाने विस्तारत आहेत. बदलत्या जागतिक परिस्थितीने आपल्याला हे शिकवले पाहिजे की, कार गॅरेजसारखी अगदी थोडी जागासुद्धा भविष्यातील व्यवसायात तुमची सर्वात मोठी मालमत्ता बनू शकते.
फंडा असा की, कोणत्याही पुनर्विकास प्रकल्पासाठी तुमच्या जागेचा अगदी थोडासा भागही विकू नका. कारण या नवीन एआयचालित जगात भावी पिढीला चांगली नोकरी मिळवणे कठीण होईल. अशा परिस्थितीत त्यांचे घरच त्यांचे भविष्यातील दुकान बनू शकते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- पुणे: अशा घटना खपवून घेणार नाही; शिवाजीनगर कोर्टातील मंदार किवळे हल्ल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, पोलीस महासंचालकांना खडसावले!
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- सातारा: शेतीकडे केवळ व्यवसाय नव्हे, उद्योजकतेची संधी म्हणून पाहा; कराडच्या कृषी महोत्सवात सुनेत्रा पवार यांचे तरुणाईला आवाहन!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
गुन्हा
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार; जखमी मंदार किवळेचा थरारक पहिला जबाब समोर!
- अमरावती: इर्विन रुग्णालय परिसरात कापलेले दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने खळबळ!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!

























Subscribe to my channel




