गेल्या तीन दशकांपासून प्रत्येक शनिवारची सुरुवात अशीच झाली आहे. डिजिटल अलार्म वाजण्यापूर्वी मी जागा होतो. घर पहाटेच्या आगळ्या मखमली शांततेने वेढलेले असते. मी एक कप फिल्टर कॉफी बनवतो आणि एका शांत कोपऱ्यात बसतो. मंद प्रकाशात फोनद्वारे माझ्या 88 वर्षीय मामांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. त्यांची श्रवणशक्ती कमी झाल्यामुळे आमचे गप्पा मारणारे फोन कॉल्स व्हॉट्सॲपच्या शांत, तेजस्वी जगात बदलले आहेत. स्क्रीनचा हलका निळा प्रकाश कुणालाही त्रास देत नाही. अगदी माझ्या पाळीव प्राण्याला नाही. कारण ते अगदी थोड्याशा हालचालीबद्दल संवेदनशील असतात. ते तसेच झोपून राहतात. त्यांच्या नजरेत आम्ही त्या क्षणी जणू ‘काहीही उपयुक्त’ करत नसतो. परंतु आम्ही आमच्या जीवनाला धरून आहोत. आम्हा दोघांनाही केवळ आमचे कुटुंब शारीरिक व भावनिकदृष्ट्या चांगले आहे ना, एवढीच ख्यालीखुशाली जाणून घ्यायची आहे. अनेकदा आम्ही काहीही बोलत नाही तरीही आम्ही सर्व गोष्टींबद्दल बोलतो. त्यांची मुले म्हणजे माझे चुलत भाऊ परदेशात राहतात. ते अनेकदा विनोदाने म्हणतात, त्यांचे वडील माझ्याशी त्यांच्यापेक्षा जास्त बोलतात. ते चिडवतात की मीच त्यांच्या कुटुंबात राहतो. मामा मला 1940 व 50 च्या दशकात घेऊन जातात. माझ्या आईच्या तरुणपणाच्या आठवणी सांगतात. ते तिच्या शाळेत जाण्याचे, स्वयंपाक व शिवणकाम शिकण्याचे, तिच्या करुणेचे वर्णन करतात. त्यांचे शब्द माझ्या आठवणीत कायमचे कोरले जातात. आपली बहीण भावांची कशा प्रकारे दिव्यतेने काळजी घेई हेही त्यांच्याकडून मी ऐकले. त्यांना चांगले जेवण आणि विश्रांती मिळतेय याची खात्री करत असे. भाऊ थकण्यापूर्वीच तिला ते जाणवत होते. मामा 1940 आणि 50 च्या दशकातील आठवणी सांगतात. अगदी मी माझ्या बालपणीच्या आठवणींपर्यंत पोहोचत नाही तोवर. जणू काही आठवणी ऑलिम्पिक टॉर्च रिलेसारख्या एकामागून दुसऱ्याकडे जात असाव्यात. मी अनेकदा शब्दांतून प्रतिसाद देत नाही. मला गरज भासत नाही. स्क्रीनवर ‘ब्ल्यू टिक’ पाहून त्यांना माहीत कळते की मी तिथे आहे. प्रत्येक शब्द आत उतरत आहे. अचानक स्क्रीनवर एक प्रश्न येतो : “तू रडत आहेस का?’ उत्तर देण्यासाठी मला काही सेकंद लागतात. त्यांनी मला रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्या भावनिक नाळेमुळे ते अशा जाणिवांना स्पर्श करतात. कदाचित मी हे लपवत होतो. ते त्यांच्या आईच्या भावंडांबद्दलची करुणा आणि त्यागाच्या कथा सांगतात. त्याग आणि वृद्धत्वाच्या वेदना ते कबूल करतात. या भावना कदाचित फोनवर हाताळता येत नाहीत. कधीकधी ते सहा महिन्यांपूर्वी ऐकलेल्या त्याच कथेची पुनरावृत्ती करतात - पण मी त्यांना कधीच थांबवत नाही. ती गोष्ट पुन्हा सांगण्याचा आनंद मी कधीच हिरावून घेऊ इच्छित नाही. आता एक अज्ञात भीती मला घेरते. मी त्यांच्या आजारपणाबद्दल ऐकतो तेव्हा मी सर्वकाही सोडून चेन्नईला प्रवास करतो. माझे चुलत भाऊ बरोबर होते. मी त्यांच्या घराचा एक भाग झालो आहे. पण आल्यावर त्यांना मिठी मारण्याचा आनंद अल्पकाळ टिकतो. कारण आता लवकरच निरोप घ्यावा लागेल, याचे ओझे त्या क्षणी भार टाकणारे ठरते. प्रेमाचा अर्थ नेहमीच जवळ असणे असा नाही; कधीकधी त्याचा अर्थ असा होतो की ते पुन्हा पुन्हा करावे. आम्हाला हे माहीत आहे की एके दिवशी हे सर्व संपेल. मी तयार आहे की नाही हे विचालेही नाही. सध्या तरी हे साधे संभाषण पुरेसे आहे. कधीकधी आमच्या गप्पा नात्यातील भावनेवर व कधी माझ्या आईच्या आठवणींवर आधारित असतात. त्या शांततेच्या विश्वात घेऊन जातात. व्हॅलेंटाइन डे हाच आहे का? मला माहीत नाही.
फंडा असा की- प्रेमाची अनेक रूपे असतात. ते व्यक्त करण्यासाठी क्वचितच एखाद्या भव्य व्यासपीठाची गरज असते. ते विशिष्ट दिवशी किंवा विशिष्ट पद्धतीने व्यक्त करण्याची गरज नाही. ते कधीही दाखवता येते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जामीन मंजूर
- पुणे: अल्पवयीन नात घरात एकटी दिसली अन्...; इंदापूर तालुक्यात ६७ वर्षीय आजोबाचे संतापजनक कृत्य, पोलिसांनी केली अटक
- मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
- पुणे: भारत आता मार खाणारा देश राहिलेला नाही, गरज पडल्यास घरात घुसून मारणारा देश बनलाय - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र
- जळगाव : मासे पकडण्याची हौस पडली भारी; जळगावच्या धरणगाव तालुक्यात नदीच्या पात्रात पुराच्या पाण्यात अडकला तरुण, पाच तास काढले झाडावर
- पुणे: अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जामीन मंजूर
- पुणे: अल्पवयीन नात घरात एकटी दिसली अन्...; इंदापूर तालुक्यात ६७ वर्षीय आजोबाचे संतापजनक कृत्य, पोलिसांनी केली अटक
- मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
गुन्हा
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

काँग्रेस भवनाबाहेर भाजपचे आंदोलन; अमित शहा यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
श्रवण कुमार की मिसाल! कांवड़ के पलड़ों में मां और चाचा को बैठाकर हरिद्वार से लाए गंगाजल
प्रधानमंत्री मोदी ने किया अल्लूरी सीताराम राजू इंटरनेशनल एयरपोर्ट का उद्घाटन
देश विदेश
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त


























Subscribe to my channel




