बुधवारची संध्याकाळ. मुंबईतील अंधेरीच्या डीएननगर भागातून आम्ही जात होतो आणि अचानक सभोवतालचे जग एखाद्या रंगीत कलादालनासारखे भासू लागले. डोक्यावर हिरव्यागार पानांचे छत पसरलेले होते, तर पायांखाली जमिनीवर पडलेल्या फुलांचा मखमली गालिचा तयार झाला होता. हा ‘सोनमोहर’’’’चा हंगाम होता. उन्हाळ्यातील हे असे खास फूल. ते तुम्हाला वर पाहायला भाग पाडते. झाडावरून खाली पडणारी ती फुले पाहून मला हसू आवरले नाही. ती झाडे एखाद्या खोडकर मुलांसारखी वाटत होती. ती लग्नात पहिल्या मजल्याच्या गॅलरीतून पाहुण्यांवर फुलांचा वर्षाव करतात आणि आपण वर पाहिले की पळून जातात. वारा आला की पानेही इकडून तिकडे झुलत एकमेकांमागे लपत होती. जणू काही मुलेच स्वतःच्या खेळात दंग होऊन खिदळत होती. हिरव्या पानांवर नाचणारी ती पिवळी फुले पाहून माझी पत्नी म्हणाली, “हा रंगांचा मिलाफ मला भूतकाळात घेऊन जातोय. दशकांपूर्वी माझ्याकडे एक पिवळी मॅक्सी आणि हिरवा टॉप होता. त्या काळात तो फॅशनचा कळस मानला जायचा. मला प्रश्न पडलाय की... समर-2026 चा खरा रंग कोणता असेल?” जणू ‘आजच्या विश्वाचे केंद्र’ असलेल्या स्मार्टफोनने आमचे बोलणे ऐकले असावे. तितक्यात नोटिफिकेशनचा आवाज आला. डिजिटल जगाकडे उत्तर तयार होते: ‘समर-2026 साठी मुख्य रंग बटर यलो म्हणजेच लोण्यासारखा पिवळा असेल. हा एक क्रीमी आणि फिकट रंग असून सध्या तो एक नवा तटस्थ आणि सुसंस्कृत रंग म्हणून लोकप्रिय होत आहे. यामध्ये बटरी शेड्स आघाडीवर असल्या तरी, अधिक उठावदार दिसण्यासाठी कॅनरी यलो आणि चार्ट्रूससारखे गडद रंगही प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहेत.’ त्या नोटिफिकेशनची वेळ पाहून पत्नीला हसू आले. मग तिचे लक्ष माझ्या कपड्यांकडे गेले. ती म्हणाली, “मला आठवतंय, तुझ्याकडे एक फिकट पिवळा शर्ट आहे. तो तू खूप दिवसांपासून घातलेला नाहीस.” मी उत्तर दिले, “तो रंग पाहिला की मला कमी उजेडात वाढणाऱ्या पिवळ्या आणि कमकुवत वनस्पतींची आठवण येते. माझ्या मते तो रंग मला थोडा निस्तेज आणि विचित्र वाटतो.” पण तिच्याकडे यावर एक स्टायलिश उपाय होता. ती म्हणाली, “मग तो शर्ट गडद पँटसोबत न घालता पांढऱ्या शुभ्र ट्राऊझरसोबत घालून बघ.” उन्हाळ्यासाठी पिवळा रंग का चांगला आहे, हे समजून घेण्यासाठी मानसशास्त्राच्या पदवीची गरज नाही. याचे व्यावहारिक फायदे मोठे आहेत. केवळ सौंदर्यासाठीच नाही, तर उन्हाळ्यात पिवळा रंग खूप उपयुक्त ठरतो. लेमन किंवा केळीच्या सालीसारखे फिकट पिवळे रंग ऊन शोषण्याऐवजी ते परावर्तित करतात.त्यामुळे शरीर थंड राहते. हा रंग ब्लू डेनिम, पांढरी धोती किंवा चॉकलेटी लेदर सँडलसोबत अगदी उठून दिसतो. चेन्नईसारख्या ठिकाणच्या उन्हाळ्यातील लग्नासाठी तर हा पेहराव अगदी चपखल ठरतो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पिवळा रंग आशावाद, ऊब आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. फॅशनच्या भाषेत सांगायचे तर, हा रंग घालणाऱ्यासाठी आणि पाहणाऱ्यासाठी आनंदाच्या लाटेसारखा असतो. पिवळा रंग निवडणे हे तुमच्या खेळकर आणि उत्साही व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे. यामुळे तुम्ही इतरांसाठी आकर्षक ठरता आणि स्वतःच एक प्रकाश निर्माण केल्यासारखे वाटते. सगळीकडे जेव्हा साधे सुती कपडे किंवा ठराविक फुलांच्या नक्षीचे कपडे दिसतात, तेव्हा पिवळा रंग फार भडक न वाटताही लक्ष वेधून घेतो. या रंगात एक नैसर्गिक चकाकी असते, जी ऊन असो वा संध्याकाळचा मंद प्रकाश, अतिशय सुरेख दिसते. यामुळे तुमच्या पेहरावाला एक केंद्रबिंदू मिळतो आणि तुमची फॅशनची जाण दिसून येते. जर तुमचा रंगांवर विश्वास असेल, तर या उन्हाळ्यात पिवळा रंग घालणे म्हणजे केवळ जागतिक ट्रेंडचे अनुकरण करणे नाही, तर एक नवी ऊर्जा स्वीकारण्यासारखे आहे.
फंडा असा की, तुम्ही एखाद्या मीटिंगला, लग्नाला, पार्टीला किंवा साध्या कार्यक्रमाला जाताना कोणता रंग निवडता, याची तुम्हाला जितकी चांगली जाण असेल, तितका तुमचा आत्मविश्वास वाढेल. पिवळा रंग ही एक धाडसी निवड आहे. ती नकळतपणे हे सांगते की, “तुम्ही जगासमोर ठळकपणे वावरायला घाबरत नाही.’
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
महाराष्ट्र
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- कोल्हापूर: निधी मिळत नसल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप; आमदार सतेज पाटील यांचा मोठा दावा!
- जळगाव: महाराष्ट्रात दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार? आमदार बच्चू कडू यांचे मोठे भाकीत, जळगावमधून किशोर पाटलांना मंत्री करण्याची मागणी!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




