1957 मध्ये एका बोर्डिंग स्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या 14 वर्षांच्या थॉम स्टीनबेकने आपल्या वडिलांना पत्र लिहून सांगितले की, त्याचे सुसान नावाच्या मुलीवर प्रेम जडले आहे. आता आपण काय करावे हेही त्याने विचारले. पत्राच्या शेवटी त्याने वडिलांना अशी विनंतीही केली की, या भावनेला ‘पप्पी लव्ह’ म्हणून धुडकावून लावू नये. कारण त्यांच्या वडिलांनी स्वतः त्यांच्या पुस्तकांत अशा भावनांबद्दल लिहिले होते. थॉम इतके वैयक्तिक पत्र वडिलांना लिहू शकला. कारण त्याचे वडील जॉन स्टीनबेक हे अमेरिकेतील महान लेखकांपैकी एक होते. सामान्य माणूस त्यातही कामगार, स्थलांतरित, कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या कुटुंबांचे जीवन वास्तववादी व संवेदनशीलपणे साहित्यामधून मांडल्याबद्दल त्यांना 1962 मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. मंदीच्या काळातील एका कुटुंबाच्या संघर्षावर आधारित त्यांच्या ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या कादंबरीला पुलित्झर पुरस्कार मिळाला. स्वतःच्या शेताचे स्वप्न पाहणाऱ्या दोन स्थलांतरित मजुरांच्या जीवनावर आधारित ‘ऑफ माइस अँड मेन’ ही त्यांची दुसरी गाजलेली कादंबरी जगभरातील शाळांत शिकवली गेली. माझ्या शाळेतही ती अभ्यासक्रमात होती. स्टीनबेक यांनी मुलाला उत्तर देताना लिहिले- तुला प्रेम झाले असेल तर ती चांगली गोष्ट आहे. माणसाच्या आयुष्यात घडू शकणाऱ्या सर्वोत्तम गोष्टींपैकी ती एक आहे. कोणालाही तुझ्या भावनांना क्षुल्लक समजू देऊ नकोस. मात्र त्यांनी मुलाला प्रेमाच्या दोन रूपांमधील फरकही समजावून सांगितला. एक प्रेम स्वार्थी, मालकी हक्क गाजवणारे व अहंकाराने भरलेले असते. त्यात माणूस स्वतःलाच सर्वात महत्त्वाचा समजू लागतो. दुसरे प्रेम मात्र समोरच्या व्यक्तीला वेगळे, मौल्यवान आणि आदरास पात्र मानते. ते पुढे म्हणाले, पहिले प्रेम तुला लहान आणि कमकुवत बनवेल. पण दुसरे प्रेम तुला अशा ताकदीने, धैर्याने, चांगुलपणाने व शहाणपणाने भरून टाकेल. त्याची तुला स्वतःलाही कल्पना नव्हती. मी स्टीनबेक यांच्या ‘ईस्ट ऑफ ईडन’, ‘कॅनरी रो’ आणि ‘द पर्ल’ यांसह नऊ पुस्तके वाचली आहेत. मला माझ्या पत्नीवर प्रेम झाले तेव्हा मी त्यांना स्टीनबेक यांचे त्यांच्या पाळीव कुत्रा चार्लीसोबतच्या अमेरिकाभरच्या प्रवासावर आधारित ‘ट्रॅव्हल्स विथ चार्ली’ हे पुस्तक भेट दिले होते. हे पुस्तक मी यासाठी निवडले. कारण माझ्या पत्नीच्याही स्नोई नावाचा पाळीव कुत्रा होता. लग्नानंतर तोही आमच्या घरी आला. त्यामुळे मला वाटते की, स्टीनबेक यांनी पहिल्या प्रेमातील आव्हाने व त्याचे सौंदर्य प्रभावीपणे मांडले. पहिले प्रेम तुमचे हृदय कोणीतरी जिंकून घेतलेले असतानाही तुमच्यातील सर्वोत्तम व्यक्तिमत्त्व शोधण्यास मदत करू शकते. किशोरवयीन प्रेमाच्या टप्प्यात असलेल्या पालकांनी ही बाब समजून घ्यावी. हा भावनिक उन्मेष हार्मोन्स आणि न्यूरोट्रान्समीटर यांच्या एकत्रित परिणामामुळे घडतो. नॉरएपिनेफ्रिनमुळे पोटात गुदगुल्या झाल्यासारखे वाटते. अॅड्रेनालिनमुळे हातांना घाम येतो व ऑक्सिटोसिनमुळे भावनिक जुळवणूक वाढते. मेंदूवरील संशोधन सांगते की, प्रेमात पडल्यावर मेंदूमधील तेच रिवॉर्ड सर्किट्स सक्रिय होतात. ते अमली पदार्थांच्या व्यसनामध्ये सक्रिय होतात. स्टीनबेक यांचे पत्र आजही महत्त्वाचे वाटते. कारण त्याची सुरुवात आदराने होते. त्यांनी मुलाच्या भावनांची थट्टा केली नाही, त्या नाकारल्या नाहीत किंवा दुर्लक्षितही केल्या नाहीत. आधी त्यांनी त्या भावना स्वीकारल्या आणि नंतर योग्य-अयोग्य समजावून सांगितले. आजच्या पालकांसाठीही किशोरवयीन प्रेम हाताळण्यासाठी काही व्यवहार्य उपाय पुढीलप्रमाणे-
1. त्यांच्या भावनांची थट्टा करू नका : मुलांच्या भावना कमी लेखल्यास ते पालकांपासून दूर जातात. मग ते मित्र किंवा सोशल मीडियावर अधिक अवलंबून राहतात. विश्वास टिकवण्यासाठी त्यांच्या भावनांचा आदर करा.
2. सल्ला देण्यापूर्वी त्यांचे मन ऐका : ‘ती व्यक्ती कोण आहे?’ एवढेच विचारू नका. ‘तुला तिच्यात काय आवडले?’ किंवा ‘या नात्यामुळे तुला कसे वाटते?’ असे प्रश्न विचारल्यास मुलांचे विचार समजून घेता येतात आणि संवाद अधिक खुला होतो.
3. आकर्षण, व्यक्तिमत्त्व यातील फरक समजावून सांगा : त्यांना विचारा, ती व्यक्ती दयाळू, आदर देणारी व प्रामाणिक आहे का? स्वार्थी व उदार प्रेमातील फरक स्टीनबेक यांनी सांगितला, तो 1957 पेक्षा आजच्या इन्स्टाग्रामच्या युगात अधिक महत्त्वाचा आहे.
4. डिजिटल आयुष्यात रस घ्या : आजचे बहुतांश प्रेमसंबंध मोबाइलवरच फुलतात. गोपनीयता, ऑनलाइन फसवणूक, छायाचित्रे शेअर करण्याचे धोके, सायबर-बुलिंग व डिजिटल ठसे कायम राहण्याचे परिणाम याबाबत त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा करा. फंडा असा आहे की, प्रेमाने आयुष्यात प्रवेश केल्यास त्याला बहुश्रुत व्यक्तीप्रमाणे शांतपणे हाताळा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



