“बाळा, गुडियाचे बाथरूम वापरू नकोस. तू ते घाण करून ठेवतोस आणि तिला ते आवडत नाही,’ आई स्वयंपाकघरातून आवाज देत सांगते, तरीही मुलगा तेच वॉशरूम वापरतो. दोन वेगवेगळ्या आकारांचे सँडविच बनवत असताना- कारण गुडियाला चार तुकड्यांत कापलेले सँडविच आवडते, तर मुलाला त्रिकोणी आकाराचे- ती पटकन गुडियाच्या बाथरूममध्ये जाऊन ते कोरडे असल्याची खात्रीही करते. असे करताना ती पुटपुटते, “हा मुलगा तर कधीच माझे ऐकत नाही. याला समजत नाही की गुडिया आता मोठी झाली आहे आणि तिला तिची प्रायव्हसी हवी आहे.’ आज घरात कोण काय खाणार, मुलीने आज क्लासला काय घालून जायला हवे, किती वाजता घरातून निघावे जेणेकरून उशीर होणार नाही, कुटुंबातील प्रत्येक सदस्याची अशी कोणती समस्या आहे जी ते बाहेर पडण्यापूर्वी सोडवणे आवश्यक आहे, पाळीव प्राण्यांना फिरायला कधी घेऊन जायचे, कामवाली आल्यावर तिला काय सूचना द्यायच्या आहेत- या निर्णयांसोबतच ती नवऱ्याचे पाकीट पाहून त्यात पैसे आहेत की नाही हेदेखील तपासते, कारण आता सगळीकडे ऑनलाइन पेमेंट होते, असे सांगून ते नेहमी पाकीट रिकामे ठेवतात व मग एखाद्या छोट्याशा कारणासाठी रोख रकमेअभावी अडकून पडतात. ती आपला संपूर्ण दिवस निर्णय घेण्यात घालवते- छोटे निर्णय, मोठे निर्णय, सततचे निर्णय, अगदी असे निर्णयही जे कुणाला दिसतही नाहीत. घर-कुटुंब नावाचे यंत्र चालवण्याचे मानसिक ओझे हे काही छोटे काम नाही. मातृत्व नेहमीच थकवा व त्यागाची अशी कहाणी राहिली आहे, जी निभावली तर जाते, परंतु त्याबद्दल बोलले जात नाही. तिचा रागही नेहमीच क्षणिक असतो. जेव्हा मुलगी मागून येऊन तिला मिठी मारते व म्हणते, “आई, आय लव्ह यू,’ तेव्हा कुणालाच समजत नाही की काही मिनिटांपूर्वी संपूर्ण घरावर बरसणारा तिचा राग अचानक कुठे वितळून गेला. तीही तिला हलकेच मिठी मारत एका श्वासात म्हणते, “ठीक आहे, ठीक आहे, माझेही तुझ्यावर प्रेम आहे. पण ही तयार होण्याची वेळ आहे का? बघ, आता नाश्त्यासाठीही वेळ उरला नाही. म्हणूनच मी नेहमी सांगते की लवकर झोपत जा.’ आमच्या काळातील माता काळजी घेणाऱ्या होत्या, पण आजच्या मातृत्वात एका वेगळ्याच प्रकारचे मानसिक ओझे जोडले गेले आहे. “तू तुझा चार्जर घेतला आहेस का?’ यासारख्या अत्यंत साध्या प्रश्नापासून ते नवऱ्याच्या कारच्या फास्टॅगमध्ये टोलचे पैसे टाकण्यासारख्या गुंतागुंतीच्या गोष्टींपर्यंत- ती सर्व काही मानसिकरीत्या हाताळत असते. आमच्या काळच्या आयांप्रमाणेच तिलाही वाटते की तुम्ही तिचे कौतुक करावे, पण त्याहूनही अधिक आजच्या आयांना खरोखरच असे वाटते की तिने आपल्या मुलांसाठी, जोडीदारासाठी आणि विस्तारित कुटुंबासाठी ती काय-काय करते हे कुणीतरी पाहावे, आणि तेही आपली पूर्णवेळ नोकरी करत असताना. आजचे वडील पूर्वीपेक्षा अधिक सहभागी आहेत, तरीही अनेक घरांमध्ये घरगुती व्यवस्था चालवण्याचे न दिसणारे काम आणि मानसिक ओझे आयाच अधिक उचलतात. गोष्ट फक्त ही नाही की काय केले जात आहे, तर हे लक्षात ठेवणेदेखील आहे की कोणते काम कुटुंबातील कोणत्या सदस्याच्या सोयीनुसार योग्य वेळी करायचे आहे. कुणाला पनीर आवडते आणि कुणाला नाही, हे लक्षात ठेवणेदेखील याच गोष्टीचा एक भाग आहे. आणि म्हणूनच मदर्स डेदेखील त्यांच्या टु-डु लिस्टचे आणखी एक काम बनू नये. त्यांना हे विचारू नका की “तुम्हाला मदर्स डे कसा साजरा करायला आवडेल?’ त्यांना हे विचारू नका की “तुम्हाला काय खरेदी करायचे आहे?’ ब्रंचसाठी कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जायचे आहे, कोणती साडी खरेदी करायची आहे किंवा कोणते छोटे दागिने घ्यायचे आहेत, हे त्यांना सांगायचे नसते. त्यांना काय आवडते आणि त्यांना काय घालायचे आहे, हे तिची मुलगी, मुलगा व नवऱ्याला माहीत असायला हवे. मदर्स डेलाही त्यांना निर्णय घ्यायचे नसतात. किमान आजच्या दिवशी तरी त्यांना घराची व्यवस्था चालवण्यापासून दिलासा द्या, जरी माझी अशी इच्छा असेल की तुम्ही असे नेहमी करावे. मी आज तुम्हाला आईला कोणताही निर्णय न घेऊ देता तिचे लाड करण्याचा सल्ला देत आहे हे पाहून माझी आई ताऱ्यांमधून मला पाहून हसत असेल.
फंडा हा आहे की जेव्हा मातांना हे जाणवते की तुम्ही त्यांच्या आवडीच्या सर्वात छोट्या गोष्टीकडेही लक्ष देता, तेव्हा त्यांना ते खूप आवडते. त्यांनी चांगल्या आणि संवेदनशील मुलांचे संगोपन केले आहे, ही केवळ त्यांच्यासाठीच दिलाशाची गोष्ट नसते, तर यातून त्यांच्यावर प्रेम केले जाते हेही त्यांना जाणवते. आणि विश्वास ठेवा, प्रत्येक आई याची हक्कदार आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




