आठवीपासूनच प्रत्येक शैक्षणिक वर्षात वर्गशिक्षिका एकच प्रश्न विचारायच्या, “मोठं होऊन तुला काय व्हायचंय?” तो मुलगा नेहमी एकच उत्तर द्यायचा, “अजून माहीत नाही.” याउलट त्याच्या वर्गमित्रांची स्वप्नं आधीच ठरलेली असायची- डॉक्टर, इंजिनिअर, पायलट किंवा बँकर. पण हा मुलगा मात्र नेहमीच ‘द्विधा मनःस्थितीत’ असायचा. शिक्षिकेला वाटायचं की तो अभ्यासात मागे आहे, म्हणूनच त्या त्याच्यावर उत्तर देण्यासाठी कधी दबाव आणत नसत. पण, त्याचे स्वप्न इतरांपेक्षा कितीतरी वेगळे आणि अनोखे आहे, याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. त्याचे वडील चर्मकार होते. गेल्या 13 वर्षांपासून तो वडिलांना पादत्राणे बनवताना पाहत होता. प्रत्येक टाका, प्रत्येक सोल आणि दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक हीच त्याची शाळा बनली होती. त्याच्या मनात नकळत एक स्वप्न आकाराला येत होतं. चर्मकार बनण्याचं नव्हे, तर एक दिवस स्वतःची बुटांची कंपनी सुरू करून वडिलांना त्या कंपनीचा ‘चेअरमन’ बनवण्याचं! पण, लोक हसतील या भीतीने त्याने आपले हे स्वप्न कधी कुणाजवळ बोलून दाखवले नाही. एका दुपारी शिक्षिकेने त्याला बूट बनवण्याच्या कामात पूर्णपणे हरवून गेलेले पाहिले. पुढच्याच आठवड्यात त्यांनी बूट बनवणाऱ्या एका कंपनीच्या मालकाला वर्गात आमंत्रित केले. तो कार्यक्रम जसा पुढे सरकला, तसा तो एरवी शांत राहणारा मुलगा पूर्णपणे बदलून गेला. त्याने लेदरचे ग्रेड, मोल्ड्स, प्रॉडक्शन लाइन, क्वालिटी कंट्रोल, एक्स्पोर्ट, मशिनरी, सप्लाय चेन आणि ब्रँडिंग याबद्दल थेट प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तो उद्योजक थक्कच झाला! वर्गातील इतर बहुतांश मुलांनी हे शब्द पहिल्यांदाच ऐकले होते, पण हा मुलगा मात्र थेट त्या उद्योगाचीच व्यावसायिक भाषा बोलत होता. पुस्तकांमधून कधीही न मिळणारी त्या मुलाची जिज्ञासा त्या उद्योजकाने त्वरित ओळखली. कार्यक्रम संपताना त्यांनी त्या मुलाला सुट्ट्यांच्या काळात विद्यावेतनासह इंटर्नशिपची ऑफर दिली, तसेच त्याचे मार्गदर्शक बनण्याचे आश्वासनही दिले. याच एका संधीने त्याच्या स्वप्नाला योग्य दिशा दिली. ही केवळ एक प्रेरणादायी गोष्ट नाही. कॅलिफोर्नियातील ‘लिंक्ड लर्निंग अलायन्स’च्या विचारसरणीचे हे उत्तम उदाहरण आहे. ही एक स्वयंसेवी संस्था असून, ती शाळांसोबत भागीदारी करून 3 लाख 30 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी 600 हून अधिक करिअरचे मार्ग तयार करत आहे. काही मोजक्या आणि पारंपरिक व्यवसायांमध्ये स्वतःला कोंडून घेण्याऐवजी, येथील विद्यार्थी शेती, मनोरंजन आणि सार्वजनिक धोरण यांसारख्या विविध क्षेत्रांचा शोध घेत आहेत. ‘लिंक्ड लर्निंग’ केवळ तज्ज्ञांची भाषणे आयोजित करत नाही, तर ‘ड्युअल एनरोलमेंट’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॉलेज क्रेडिट मिळवून देण्यास आणि उद्योग जगताकडून मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे मिळवण्यास मदत करते. येथे शिक्षण केवळ वर्गापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनाशी जोडले जाते. या उपक्रमात गरीब आणि वंचित कुटुंबातील मुलांवर विशेष लक्ष दिले जाते, जेणेकरून परिस्थितीच्या नाइलाजामुळे त्यांच्यातील प्रतिभेचा कोंडमारा होऊ नये. यातील अनेक विद्यार्थी कदाचित कधीही पारंपरिक महाविद्यालयीन शिक्षण घेणार नाहीत, तरीही ते आपले कौशल्य, दांडगा आत्मविश्वास आणि करिअरच्या सुवर्णसंधींसह पदवीधर होतात.या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सतत मिळणारा प्रतिसाद. प्रत्येक प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर विद्यार्थी आपले काम उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांसमोर सादर करतात. हे तज्ज्ञ केवळ त्यांच्या ज्ञानाचीच नाही, तर त्यांची जिज्ञासा, संवादकौशल्य, संयम आणि समस्या सोडवण्याची क्षमता या गुणांचीही पारख करतात. शिक्षक हा अभिप्राय वर्गातील अध्यापनात समाविष्ट करतात, ज्यामुळे प्रत्येक मूल आपल्या बलस्थानांवर लक्ष केंद्रित करून शिक्षणात पुढे जात राहते.
फंडा असा की, भविष्य केवळ अशाच लोकांचे आहे ज्यांना नेमके काय करायला आवडते हे ठाऊक आहे आणि ज्यांना आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्याची योग्य संधी मिळते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- रायगड: रामधरणेश्वर येथील तलावात बुडून २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
- 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेता सतीश नायकोडी यांची फसवणूक; एसआरए इमारतीत स्वस्त फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखांची लुबाडणूक
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून ३१ वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थिनीवर रात्री अत्याचार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने खळबळ!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- ईएमआय एक-दोन दिवस उशिरा भरल्यास सीबीआयएल स्कोअर खराब होतो का; जाणून घ्या नियम आणि परिणाम
- बीड: आष्टीत अमृता फडणवीस यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; बीडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
- कोल्हापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अपहार प्रकरणात मोठी घडामोड; १५ दिवसांपूर्वी जमा झाले आणखी २८ लाख
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज




























Subscribe to my channel




