
Pune : शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविले जात नसल्याबाबत पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठल्यानंतर पथ विभागाने रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या पावसाने दिलेल्या उघडिपीचा फायदा घेत पालिकेने गेल्या ९ दिवसांत ४९९ पेक्षा अधिक खड्डे बुजविले आहेत. पुढील दोन दिवसांत युद्धपातळीवर काम करून शहरातील सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचा प्रयत्न केला जाणार आहे.
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आलेला असतानाही शहरातील अनेक रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच असल्याची तक्रार नागरिकांकडून आणि वाहनचालकांकडून केली जात होती. रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने दुरुस्त करावेत, यासाठी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून पालिका आयुक्तांना भेटून निवेदने देण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविले जावेत, असे आदेश पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिले होते. यासाठी गणेशोत्सवापूर्वी पाच दिवस आणि विसर्जनाच्या अगोदर पाच दिवस खड्डे दुरुस्तीची विशेष मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
पालिका आयुक्तांनी केलेल्या सूचनांचे पालन करत पथ विभागाने खड्डेदुरुस्तीस सुरुवात केली आहे. पथ विभागाने नऊ दिवसांमध्ये ४९९ पेक्षा अधिक खड्डे बुजविले असल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, २ हजार ७९५ टन हॉटमिक्सचा (गरम डांबर) वापर करण्यात आला आहे. २६ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या काळात पालिकेच्या पथ विभागाने ६ हजार ६९६ चौरस मीटर रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण केले असून, पुढील दोन दिवसांत उरलेल्या रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त केले जाणार आहेत. ही कामे करताना ४३ चेंबर, तसेच सतत पावसाचे पाणी साचत असल्याच्या दोन जागा दुरुस्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
|
Pune : राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान…जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांत किती नुकसान… |
शहरातील ज्या प्रमुख रस्त्यांवरून श्री गणेशाची मिरवणूक काढली जाते, त्या मार्गांची पाहणी पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. मिरवणुकीचा कोणत्याही मंडळाला त्रास होऊ नये, यासाठी या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने केली जात आहेत. बहुतांश कामे पूर्ण झाली असून, किरकोळ कामे प्रलंबित असल्याचे पावस्कर म्हणाले.
पाऊस थांबल्याने रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण केली जात आहे. मिरवणूक जाणाऱ्या मार्गांची पाहणी करून तेथील कामे पूर्ण केली जात आहेत. गणेशोत्सवापूर्वी ही कामे पूर्ण होतील
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान





















Subscribe to my channel


