कृपया माझ्या सवयींवर टीका करू नका. मी जुन्या विचारांचा माणूस आहे. विंडो शॉपिंग करतानाही मी आधी किंमत पाहतो आणि मग उत्पादनाकडे लक्ष देतो. गेल्या आठवड्यात मुंबईतील घाटकोपर येथील एका मॉलमध्ये कोणाची वाट पाहत असताना मी स्मार्ट बाजारमध्ये गेलो. आत प्रवेश करताच स्वयंपाकघर व स्नानगृहाशी संबंधित वस्तूंनी माझे स्वागत केले. त्यामध्ये फिनाइल, भांडी धुण्याचा साबण, द्रव क्लिनर आणि इतर डिटर्जंट्स होते. मी फिनाइलची एक बाटली हातात घेतली आणि किंमत पाहून थक्क झालो. त्या ब्रँडेड फिनाइलची किंमत 307 रुपये होती. मी लगेच घरी फोन करून जुन्या फिनाइलच्या बाटलीवरील किंमत विचारली. ती ऐकून मला आणखी मोठा धक्का बसला. जुन्या बाटलीची किंमत केवळ 199 रुपये होती. त्यानंतर मी पेट्रोलियम रसायने किंवा नॅफ्थापासून तयार होणाऱ्या स्वच्छता उत्पादनांच्या किंमती मनात नोंदवून ठेवल्या. उत्पादनांकडून नजर हटवून मी त्या मोठ्या स्टोअरमधील ग्राहकांचे निरीक्षण केले. केवळ मीच नव्हे, तर महिनाभराचा किराणा घेण्यासाठी आलेले अनेक लोक वाढत्या किंमतींमुळे आश्चर्यचकित झाले होते. त्यांच्यात एक समान प्रवृत्ती दिसून आली. घरगुती बजेटवरील वाढत्या ताणामुळे बहुतेक ग्राहक आपला आवडता ब्रँड सोडून त्याच शेल्फवरील स्वस्त पर्याय निवडण्यास तयार होते. वाढत्या किंमती केवळ मध्यमवर्गीयांच्या खर्चाच्या सवयी बदलत नाहीत, तर आपण कोणत्या गोष्टींवर खर्च करायचा हे ठरवण्याची मानसिकताही बदलत आहेत. तरुण महिला आणि कमी उत्पन्न असलेले ग्राहक ब्रँडबद्दलची निष्ठा सोडण्यास अधिक तयार दिसले. एका महिलेने पतीला सांगितले की, नॅफ्थापासून बनणाऱ्या जैवविघटनशील पिशव्यांची किंमत दुप्पट झाल्यामुळे आता ऑनलाइन खरेदीसोबत मिळणाऱ्या कागदी पिशव्यांचा कचऱ्यासाठी वापर करू. वैयक्तिक निगा राखणाऱ्या उत्पादनांमध्ये फार कमी लोक पसंती बदलताना दिसले. मात्र स्वच्छता उत्पादनांच्या बाबतीत जवळपास सर्वजण कमी परिचित ब्रँड खरेदी करण्यास तयार होते. घरी परतल्यानंतर माझी एका खासगी विद्यापीठाच्या मालकाशी चर्चा झाली. त्यांच्या विद्यापीठात वैद्यकीय, परिचारिका महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था आहेत. मी माझे हे साधे निरीक्षण त्यांच्याशी शेअर केले. त्यांच्या आवाजातील उत्साह असा होता. जणू मी त्यांच्या मोठ्या समस्येचे उत्तरच शोधून काढले होते. त्यांनी मला थोडा वेळ थांबवून दुसऱ्या फोनवरून फार्मसी विभाग प्रमुखांना संपर्क साधला आणि विद्यापीठात वापरल्या जाणाऱ्या फिनाइल व इतर स्वच्छता उत्पादनांचे पर्याय तयार करण्यास सांगितले. वसतिगृहातील कँटीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडी धुण्याच्या पावडर, द्रव क्लिनर आणि इतर स्वच्छता उत्पादनांवर दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात. फार्मसी विभाग प्रमुखांनी सुचवले की, मोठ्या परिसरांसाठी सोडियम सल्फेट, एसएलईएस (सोडियम लॉरिल ईथर सल्फेट) आणि पाण्याचे मिश्रण उपयोगी ठरू शकते. त्यात जंतुनाशक म्हणून आयसोप्रोपाइल अल्कोहोल मिसळल्यास फरशी लवकर सुकते आणि महागड्या ब्रँडेड फिनाइलशिवायही जीवाणू नष्ट होतात. पाइन ऑइल, पाणी आणि इमल्सिफायर यांचे मिश्रण करून साधे जंतुनाशक तयार करता येते. त्यामुळे 307 रुपयांपेक्षा खूप कमी खर्चात तीच परिचित सुगंध आणि स्वच्छता मिळू शकते. हे ऐकताच मला माझे बालपण आठवले. त्या काळात आम्ही रिठ्याचा वापर करत असू. तो रासायनिक सर्फॅक्टंट्सचा शंभर टक्के नैसर्गिक पर्याय आहे. बियाविरहित लिंबू किंवा लिंबाच्या साली, रिठा, व्हिनेगर आणि समुद्री मीठ एकत्र उकळून आम्ही चरबी काढून टाकणारे प्रभावी भांडी धुण्याचे द्रव तयार करत असू. माझी आई पांढरा व्हिनेगर, पाणी आणि थोडासा भांडी घासण्याचा साबण मिसळून स्वयंपाकघरातील काउंटर, फरशा आणि टाइल्स स्वच्छ करण्यासाठी प्रभावी स्प्रे तयार करायची. फंडा असा की - मोठ्या उद्योगांपुरतेच नव्हे तर आपल्यासारख्या सामान्य कुटुंबांचाही दैनंदिन खर्च सातत्याने वाढत आहे. त्यामुळे खर्चात कपात करून बजेट संतुलित ठेवण्याचे नवे मार्ग शोधणे ही काळाची गरज बनली आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: मुंबई-ठाण्यातील जुगाऱ्यांचा नाशिकरोड रेल्वे स्थानकात अड्डा; पोलिसांनी वेशांतर करून टाकलेल्या छाप्यात १३ जण जेरबंद
- नाशिक: रामकुंडावर छठपूजेसाठी ऑईल पेंटने नावे लिहिणाऱ्यांना मोठा दणका; नाशिक महापालिकेकडून दंडात्मक कारवाई
- पुणे: दादांच्या अचूक प्रश्नांसमोर वरिष्ठ सनदी अधिकारीही पडायचे निरुत्तर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अजितदादांच्या कडक शिस्तीचे व कामाच्या अचूकतेचे भरभरून कौतुक
- पुणे: दादा, तुमचा प्रवास अर्धवट राहिला असेल; पण तुमच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही पूर्ण करू; अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी सुनेत्रा पवार भावुक
महाराष्ट्र
- नागपूर: पोलिसांचा मोठा दणका! प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या ७८ चकऱ्या जप्त, एक जण जेरबंद
- नाशिक: मुंबई-ठाण्यातील जुगाऱ्यांचा नाशिकरोड रेल्वे स्थानकात अड्डा; पोलिसांनी वेशांतर करून टाकलेल्या छाप्यात १३ जण जेरबंद
- नाशिक: रामकुंडावर छठपूजेसाठी ऑईल पेंटने नावे लिहिणाऱ्यांना मोठा दणका; नाशिक महापालिकेकडून दंडात्मक कारवाई
- पुणे: दादांच्या अचूक प्रश्नांसमोर वरिष्ठ सनदी अधिकारीही पडायचे निरुत्तर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अजितदादांच्या कडक शिस्तीचे व कामाच्या अचूकतेचे भरभरून कौतुक
गुन्हा
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनाला निघालेल्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार!
- गोवा: महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यावर सरकारचा विशेष भर; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!


























Subscribe to my channel




