नागपूर: नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत (Nagpur MLC Election 2026) बिनविरोध निवडीची असलेली शक्यता आता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या दोन उमेदवारांमुळे निर्माण झालेली कमालीची उत्सुकता आणि राजकीय संभ्रम अखेर संपला आहे. काँग्रेसचे डमी उमेदवार दिनेश ढोले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे (BJP) डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अतुल लोंढे यांच्यात थेट आणि चुरशीचा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक का जाहीर झाली?
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिल्याने नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ही जागा रिक्त झाली होती, ज्यासाठी निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
काँग्रेसच्या दोन अर्जांमुळे वाढला होता संभ्रम
या निवडणुकीसाठी भाजपने आपले माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, काँग्रेसकडून पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले अशा दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात अंतर्गत वादाची आणि रणनीतीची जोरदार चर्चा सुरू झाली होती. एबी फॉर्मवर अतुल लोंढे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असल्याने तेच पक्षाचे मुख्य उमेदवार असतील, असा अंदाज होता. अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दिनेश ढोले यांनी माघार घेतल्याने अतुल लोंढे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.
संख्याबळ विरूद्ध राजकीय प्रतिष्ठा
या मतदारसंघात महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील सुमारे ८३६ लोकप्रतिनिधी मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सध्याचे पक्षीय संख्याबळ पाहता भाजपची स्थिती अत्यंत मजबूत मानली जात असून डॉ. राजीव पोतदार यांचे पारडे जड दिसत आहे.
असे असले तरी, काँग्रेसने ही निवडणूक केवळ एक औपचारिकता म्हणून न घेता किंवा ती बिनविरोध होऊ न देता भाजपला थेट टक्कर देण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला प्रभाव अजूनही कायम आहे, हा राजकीय संदेश देण्यासाठी काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक पूर्ण ताकदीने आणि प्रतिष्ठेची केली आहे. तर दुसरीकडे, भाजप देखील आपले संघटनात्मक बळ आणि जुने नेटवर्क वापरून हा विजय मोठ्या फरकाने मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे.
शहर
- नागपुर: मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत १६ अपक्ष उमेदवारांचे मानकापूर क्रीडा संकुलात आंदोलन!
- मुंबई: विकासाच्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल!
- मुंबई: व्हीईएससीओएमध्ये डॉ. आनंद आचारी देत आहेत आर्किटेक्चुरल शिक्षणाला नवी दिशा; नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक शिक्षणावर भर!
- पुणे: हिंजवडी मेट्रोचे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; बालेवाडीतील मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित!
महाराष्ट्र
- नागपुर: मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत १६ अपक्ष उमेदवारांचे मानकापूर क्रीडा संकुलात आंदोलन!
- मुंबई: विकासाच्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल!
- उल्हासनगर: लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर उल्हासनगर महापालिकेची मोठी घोषणा; ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजने'तून विद्यार्थिनींना वर्षाला मिळणार ६ हजार रुपये!
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
गुन्हा
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: काँग्रेसशासित कर्नाटकात खळबळ: एसआयआर (SIR) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर, तब्बल १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली!
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात पोहोचले; प्रतिज्ञापत्रातून मांडली सविस्तर भूमिका!
- गोवा: विधानसभा निवडणूक २०२७ आमदार नसलेल्या मतदारसंघांत भाजपची नवी रणनीती, मित्रपक्षांवरील अवलंबित्व घटवण्याचा मास्टरप्लॅन!


























Subscribe to my channel




