हरप्रीत कौर सतत वाजणाऱ्या डोअरबेलच्या आवाजाने जाग्या झाल्या. त्यांना माहीत होते की दूधवाला वाट पाहत आहे. दरवाजा उघडताच त्या माफी मागत मोडक्यातोडक्या कन्नडमध्ये म्हणाल्या, ‘सॉरी, इरडू लिटर हालू बेकू’ (सॉरी, दोन लिटर दूध पाहिजे). खूप वेळ वाट पाहिल्यामुळे दूधवाल्याची होणारी चिडचिड अचानक नाहीशी झाली. त्याला आश्चर्य वाटले की खूप कमी कन्नड येणाऱ्या पंजाबी महिलेने त्याची भाषा बोलण्याचा प्रयत्न केला. त्याने हसत दूध दिले. हा त्यांचा एकमेव प्रयत्न नाही. आपल्या अपार्टमेंटमध्ये फिरताना हरप्रीत आपल्या स्वयंपाकिणीसोबत मोडक्यातोडक्या कन्नडमध्ये बोलण्याचा सराव करतात. स्वयंपाकिणीला त्यांची ही धडपड मजेशीर वाटते, पण ती हरप्रीतचा प्रत्येक चुकीचा शब्द सुधारत जाते. बंगळुरूमध्ये वृद्धांसह अनेक लोक ग्रामरच्या पुस्तकांमधून नाही, तर रोजच्या संभाषणातून कन्नड शिकत आहेत. याने मला विचार करायला भाग पाडले. जर प्रौढ लोक संभाषणातून कन्नड शिकू शकतात, तर उत्तर भारतातील हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना संवादात्मक इंग्रजी का शिकवली जाऊ शकत नाही? एका आठवीच्या विद्यार्थ्याची कल्पना करा, जो सात वर्षांपासून इंग्रजी शिकत आहे. त्याला नाम आणि सर्वनाम यातील फरक माहीत असू शकतो, व्याकरणाचे नियम पाठ असू शकतात आणि तो परीक्षेत बऱ्यापैकी गुणही मिळवू शकतो. पण त्याला इंग्रजीत स्वतःची ओळख करून द्यायला सांगा किंवा त्याने काल काय केले हे सांगायला सांगा, तर कदाचित तो तीन वाक्येही नीट बोलू शकणार नाही. अडचण ही नाही की तो इंग्रजी शिकू शकत नाही. अडचण ही आहे की आपण त्याला इंग्रजी बोलायला नाही, तर वाचायला शिकवले आहे. प्रत्येक ग्रामीण मुलाने वर्षभरात इंग्रजीत सामान्य संवाद साधायला शिकावे, असे एखादे सोपे उद्दिष्ट विद्यापीठे ठरवू शकतात का? याची सुरुवात महागड्या क्लासेस किंवा आधुनिक तंत्रज्ञानानेच व्हायला हवी असे नाही. रोज 30 मिनिटे इंग्रजी बोलण्याच्या सरावानेही हे होऊ शकते. पहिल्या महिन्यात मुलांनी स्वतःची ओळख करून देणे, अभिवादन करणे, प्रश्न विचारणे आणि कुटुंबाबद्दल बोलणे शिकावे. पुढचे दोन महिने रोजच्या संभाषणाचा सराव करावा, जसे भाज्या खरेदी करणे, रस्ता विचारणे, डॉक्टर-शिक्षकांशी बोलणे. नंतरच्या महिन्यांमध्ये त्यांना कथा सांगणे, घटनेचे वर्णन, क्रिकेट मॅचवर चर्चा, एखाद्या फोटोबद्दल माहिती सांगणे आणि आपले मत मांडायला शिकवले जावे. हळूहळू मुले आजूबाजूच्या जगापलीकडील इतर विषयांवरही बोलायला शिकतील. कोणीही कोणाच्या चुकीवर हसणार नाही, हा एक महत्त्वाचा नियम असायला हवा. मुलांनी जोडीने बोलावे, नियमितपणे आपला पार्टनर बदलावा, नाटकात भाग घ्यावा आणि आपली प्रगती पाहण्यासाठी छोटे-छोटे ऑडिओ कन्व्हर्सेशन रेकॉर्ड करावेत. शिक्षकांना मोठी भाषणे देण्याची गरज नाही. त्यांना संभाषणातील जोडीदार बनावे लागेल, जे मुलांना बोलण्यासाठी प्रोत्साहित करतील. 12 महिन्यांच्या शेवटी असे व्हायला हवे की, मूल आत्मविश्वासाने स्वतःची ओळख करून देऊ शकेल, माहिती विचारू शकेल, छोट्या घटना सांगू शकेल, सामान्य इंग्रजी समजू शकेल आणि पाच मिनिटांपर्यंत संवाद साधू शकेल. लक्षात ठेवा, हे अस्खलितपणे बोलण्याचे नाही, तर आत्मविश्वास निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे की इंग्रजी हे बुद्धिमत्तेचे मोजमाप नाही. घरात भोजपुरी, अवधी, हिंदी किंवा मैथिली बोलणारे मूल इंग्रजी बोलणाऱ्या मुलापेक्षा कमी बुद्धिमान नसते. पण इंग्रजीमुळे उच्च शिक्षण, रोजगार आणि अशा संधींचे दरवाजे उघडू शकतात, जिथपर्यंत पोहोचणे एरवी कठीण असते. आपल्या शाळांनी अशी मुले तयार करू नयेत, जी फक्त इंग्रजीबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील. त्यांनी अशी मुले तयार केली पाहिजेत, जी जगाला प्रश्न विचारण्यासाठी इंग्रजीचा वापर करू शकतील. एखाद्या मुलाला इंग्रजी बोलायला शिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याला इंग्रजीत बोलणारा एखादा साथीदार दिला जावा. मर्यादित शब्दसंग्रह असलेले मूलही संवाद सुरू करू शकते, अट फक्त एवढीच की वातावरणाने त्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले पाहिजे, चुकांवर शिक्षा करू नये. फंडा असा की, इंग्रजी शिकण्यासाठी आणखी एक इंग्लिश ग्रामर प्रोग्राम बनवू नका आणि मुलांसमोर आणखी एक पुस्तक ठेवू नका. याला डेली स्पीकिंग प्रोग्राम बनवा, जो मुलाला त्याच्या रोजच्या जीवनाशी जोडून घेईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पुण्याच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा..! २१,८०० कोटींच्या मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
- पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २१,८०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण; विरोधकांवर कडाडून टीका करत साधला निशाणा
- मुंबई: महायुतीत मोठे वादंग! भ्रष्टाचाराचा आरोप करत मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, मिरा-भाईंदरमध्ये राजकीय संघर्ष पेटला
- पुणे: मध्य भागात दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी; वाहतूक नियोजन अन् चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
महाराष्ट्र
- कोल्हापूर: ऊसदरप्रश्नी 'स्वाभिमानी'चे पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन; किणी टोलनाक्यावर राजू शेट्टी दाखल, वाहतूक विस्कळीत
- पुणे: पुण्याच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा..! २१,८०० कोटींच्या मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
- पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २१,८०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण; विरोधकांवर कडाडून टीका करत साधला निशाणा
- मुंबई: महायुतीत मोठे वादंग! भ्रष्टाचाराचा आरोप करत मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, मिरा-भाईंदरमध्ये राजकीय संघर्ष पेटला
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी


























Subscribe to my channel




