
Mumbai : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील पहिल्या टप्प्यातील आरे – बीकेसीदरम्यानच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मेट्रो स्थानक ते इच्छितस्थळ प्रवास सुकर करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) आणि बेस्टचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावर बेस्टचे थांबे दिल्यानंतर आता बेस्टने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकांदरम्यान वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे. मंगळवारपासून बस क्रमांक ए-३१४ ची बस सेवा सुरू झाली असून ही प्रवाशांसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे.
आरे – बीकेसी भुयारी मेट्रो सेवा सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले. मात्र भुयारी मेट्रोला प्रवाशांकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मेट्रो स्थानकांपर्यंत पोहचण्यासाठी वा मेट्रो स्थानकांपासून इच्छितस्थळी जाण्यासाठी बेस्ट बस सेवा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रिक्षा-टॅक्सीचा महागडा पर्याय स्वीकारून पुढे मेट्रोने प्रवास करणे प्रवाशांना परवडणारे नाही.
त्यामुळे भुयारी मेट्रोकडे प्रवासी पाठ फिरवत आहेत. ही बाब लक्षात घेऊन एमएमआरसीने मेट्रो स्थानकाबाहेर बेस्ट सेवा सुरू करणे वा बेस्ट बसचे थांबे देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. यासाठी बेस्ट प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असून या पाठपुराव्याला यश येत आहे. काही दिवसांपूर्वीच जेव्हीएलआर मेट्रो स्थानकाबाहेर बेस्ट बस क्रमांक ३०७, ४२५, ४२८, ४१६, ५२२ सह अन्य काही बस सेवांसाठी थांबे देऊन प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे. तर आता आजपासून (मंगळवार) वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानक दरम्यान वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
|
|
आणिक आगारातील बेस्ट बस क्रमांक ए-३१४ वातानुकूलित बस सकाळी ७.३० ते रात्री ८ या वेळेत आठवड्याचे सातही दिवस धावणार आहे. वातानुकूलित मिडी प्रकाराची ही बस असणार असून वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक, अनंत काणेकर मार्ग, भास्कर न्यायालय, सर अलियावर जंग महामार्ग, कलानगर, खान अब्दुल गफार खान मार्ग, भारत नगर जंक्शन, इंडियन ऑईल, बीकेसी कनेक्टर जंक्शन, स्वावलंबन भवन, जिओ गार्डनर, मुंबई क्रिकेट असोसिएशन, सीए इन्स्टिट्यूट, कौटील्य भवन, डायमंड मार्केट , खान अब्दुल गफार खान, हिंदुस्थान पेट्रोलियम अधिकारी वसाहत, वाल्मिकी नगर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर आणि वांद्रे वसाहत मेट्रो स्थानक असा या बसचा मार्ग असणार आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



