पुणे: बारामती शहरातील भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीमधील १६ वर्षीय विद्यार्थिनीने शुक्रवारी पहाटे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून उडी घेतली. या धक्कादायक घटनेत ती गंभीर जखमी झाली आणि तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आली. परंतु, उपचारादरम्यान पहाटे सुमारे ५ वाजता तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी बारामती येथील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावी सायन्समध्ये शिक्षण घेत होती आणि तिच्या परीक्षा सुरू होत्या. तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून ती अभ्यास व परीक्षेच्या ताणवाखाली होती. आई-वडिलांकडे ती याबाबत बोलत होती, असे त्यांनी सांगितले आहे.
गुरुवारी रात्री ती १२.३० वाजेपर्यंत अभ्यासाच्या ताणाखाली होती आणि त्यानंतर टेरेसवर जाऊन येत असल्याचे सांगून ती इमारतीच्या गच्चीवर गेली. बराच वेळ होऊनही ती खाली न आल्याने तिचे वडील तिला पाहण्यासाठी वर गेले. वडिलांनी तिला आवाज दिला असता ती टेरेसच्या कड्यावर खाली पाय सोडून बसलेली होती. अचानक तिने खाली उडी मारल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. विद्यार्थिनी समोरील भागात खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. तिच्या आई-वडिलांच्या व शेजारी यांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पालकांनी सद्यस्थितीत कोणत्याही व्यक्तीविरुद्ध तक्रार किंवा संशय व्यक्त केला नाही. पण अभ्यास व परीक्षेच्या ताणामुळे आत्महत्येची शक्यता वर्तवली जात आहे, परंतु नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही. विद्यार्थिनीकडे वैयक्तिक मोबाइल नव्हता आणि ती आई-वडिलांच्या मोबाईलचा वापर करत होती. या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी बारामती शहर पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे, असे पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी सांगितले.
शहर
- मुंबई: दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा! दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकृत परवानगी!
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या समर्थनासाठी मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार!
- अहिल्यानगर: लाखोंचा गल्ला...! प्रसिद्ध संदीप हॉटेलवर आयकर विभागाचे छापे; रात्रभर सुरु होती चौकशी...
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
महाराष्ट्र
- पुणे: पद हवंय, आधी कामाचं रिपोर्ट कार्ड दाखवा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पुण्यातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची कानउघडणी!
- मुंबई: दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा! दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकृत परवानगी!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या समर्थनासाठी मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार!
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर


























Subscribe to my channel




