पुणे: आलेगाव पागा (ता. शिरूर) येथील सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबातील विकास सोपान अवचिते यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने सन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्य कर निरीक्षक पदावर निवड झाली आहे. कोणत्याही मोठ्या सुविधा अथवा विशेष मार्गदर्शनाचा आधार नसतानाही जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मिळविलेल्या या यशाबद्दल आलेगाव पागा परिसरातून अवचिते यांचे अभिनंदन होत आहे.
विकास अवचिते यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आलेगाव पागा येथे झाले. त्यानंतर त्यांनी न्हावरे येथील श्री. मल्लिकार्जुन माध्यमिक विद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे पुणे येथील वाडिया महाविद्यालयातून कला शाखेची पदवी सन २०१६ मध्ये पूर्ण केली. पदवीचे शिक्षण घेत असतानाच विकास यांना स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण झाली. ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातून आलेल्या विकास यांच्यासमोर आर्थिक अडचणींसह अनेक आव्हाने होती. मात्र, या अडचणींना खचून न जाता त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्याचा ध्यास घेतला.
विशेष म्हणजे, कोणत्याही मोठ्या सुविधा किंवा विशेष मार्गदर्शनावर अवलंबून न राहता त्यांनी घरीच नियमितपणे आणि चिकाटीने अभ्यास सुरू ठेवला. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले. अखेर २०२५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्यानंतर त्यांच्या मेहनतीला यश आले आणि राज्य कर निरीक्षकपदावर निवड होण्याचे स्वप्न साकार झाले. विकास अवचिते यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर आलेगाव पागा परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. 'परिस्थिती कोणतीही असो, जिद्द आणि सातत्य असेल तर यश निश्चित मिळते,' हा संदेश अवचिते यांच्या यशातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
शहर
- पुणे: प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात अनोखे मुंडन आंदोलन; खड्ड्यात बसून सामाजिक कार्यकर्त्याचा तीव्र रोष, राजगुरुनगर-खरपुडी मार्गावरील प्रकार
- लखनऊ: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रभारी नियुक्त
- कोल्हापूर: स्वतःच्या खिशातून खर्च, अडीच किमी जंगलवाट अन् ११ विद्यार्थ्यांसाठी अथक धडपड; शिक्षक पांडुरंग चव्हाणांचा प्रेरणादायी प्रवास
- सोलापूर: शंभर टक्के दृष्टी नसतानाही अंधत्वावर मात करत सुजित शिंदेंची क्लास वन शिक्षणाधिकारी पदाला ऐतिहासिक गवसणी
महाराष्ट्र
- पुणे: प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात अनोखे मुंडन आंदोलन; खड्ड्यात बसून सामाजिक कार्यकर्त्याचा तीव्र रोष, राजगुरुनगर-खरपुडी मार्गावरील प्रकार
- लखनऊ: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रभारी नियुक्त
- कोल्हापूर: स्वतःच्या खिशातून खर्च, अडीच किमी जंगलवाट अन् ११ विद्यार्थ्यांसाठी अथक धडपड; शिक्षक पांडुरंग चव्हाणांचा प्रेरणादायी प्रवास
- सोलापूर: शंभर टक्के दृष्टी नसतानाही अंधत्वावर मात करत सुजित शिंदेंची क्लास वन शिक्षणाधिकारी पदाला ऐतिहासिक गवसणी
गुन्हा
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
- उत्तर प्रदेश: वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या वृद्ध मातेची घरातच निर्घृण हत्या, सोन्याचे दागिने लांबवले
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले

























Subscribe to my channel



