गेल्या आठवड्यात दिल्लीत ‘रचनात्मक काँग्रेस''च्याएका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या परदेश दौऱ्यांवर भाष्य केले. दौऱ्यांदरम्यान परदेशीनेत्यांना मिठी मारण्याच्या त्यांच्या सवयीची त्यांनी टरउडवली. तिथे उपस्थित तरुण प्रेक्षक या टवाळीवरहसले खरे, पण काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी यातइटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे नावओढल्याने ही बाब अधिकच आक्षेपार्ह ठरली. विरोधीपक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी टवाळी करण्याच्या याधोरणावर आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलीआहे. अशा प्रकारच्या उपहासातून व्यासपीठावर टाळ्यामिळतील आणि हेडलाईन्सही बनतील. मात्र, सरकारचे परराष्ट्र धोरण समजून घेऊन त्यावर केलेली योग्य टीका आणि यात फरक असतो. जनता विरोधी पक्षनेत्याकडून नेहमीच काहीतरी ठोस विचारांची अपेक्षा करते. निवडणुकीत योग्य पर्याय निवडण्यापूर्वी जनतेला विचार करायला जागा हवीअसते. संसदीय व्यवस्थेत विरोधी पक्षनेता हासत्ताधाऱ्यांवर टीका तर करतोच, पण सोबतचधोरणांचा एक सक्षम पर्यायही देशासमोर ठेवतो. गेल्या12 वर्षांत राहुल गांधी यांची ‘पप्पू'' अशी प्रतिमा तयार करण्यासाठी मोठा प्रयत्न झाला. त्यामुळेच राहुल गांधीआता पंतप्रधानांच्या प्रतिमेला छेद देण्यासाठी त्याचतीव्रतेने पलटवार करत आहेत. पण यामुळे देशातीलराजकीय चर्चेचा स्तर मात्र दुर्दैवाने घसरला आहे.काळासोबत राजकारण बदलते आणि ते बदललेहीपाहिजे. राहुल गांधी यांनी 2022 मध्ये 145 दिवसांची‘भारत जोडो यात्रा'' काढली होती. या यात्रेच्यामाध्यमातून त्यांनी आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्नकेला. दक्षिणेतील कन्याकुमारीपासून उत्तरेतीलश्रीनगरपर्यंत ही यात्रा 4,000 किलोमीटरहून अधिकचालली. त्यावेळी त्यांचा निश्चय, मेहनत आणिसर्वसामान्यांशी साधलेला संवाद यामुळे भाजपबॅकफूटवर गेला होता. 2024 च्या सार्वत्रिकनिवडणुकीत याचे परिणाम दिसून आले. काँग्रेसनेलोकसभेतील आपल्या जागा 99 पर्यंत वाढवल्या.एवढेच नाही तर भाजपला स्पष्ट बहुमतापासून रोखले.त्यामुळे भाजपला आघाडी सरकार स्थापन करणे भागपडले. अलीकडेच देशभरात तरुणांनी उभारलेल्याआंदोलनांनंतर राजकारणातील समीकरणे बदलण्याचीशक्यता निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांना याआंदोलनातून निर्माण झालेल्या ऊर्जेचा फायदा घ्यायचाअसेल, तर त्यांना आपली प्रतिमा पुन्हा एकदा बदलावीलागेल. त्यांची ‘पप्पू'' ही प्रतिमा आता पुसली गेली आहे.पण आता राहुल गांधी यांनी आपण नेमक्या कोणत्याविचारांच्या आणि धोरणांच्या बाजूने उभे आहोत, हेस्पष्टपणे सांगायला हवे. भविष्यात काँग्रेसचे किंवाकाँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सरकार आल्यासदेशवासीयांसाठी त्याचा काय अर्थ असेल, हे त्यांनीमांडले पाहिजे. विशेषतः तरुण मतदारांसाठी ही बाबअत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या 12 वर्षांपासून निर्माणझालेली शांततेची भिंत या तरुणांनी पाडली आहे.लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी आहेत.अशा वेळी काँग्रेसला आपल्या विजयाची शक्यतावाढवायची असेल, तर राहुल गांधी यांना सरकारलासतत खाली खेचणारे नकारात्मक राजकारण सोडावे लागेल. देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा ठेवणाऱ्याव्यक्तीकडून अधिक गांभीर्याची अपेक्षा असते. आपणराहुल गांधी यांना ‘अँग्री यंग मॅन''च्या रूपात पाहिलेआहे. रस्त्यावर उतरून लढा देणारा नेता म्हणूनहीपाहिले आहे. गेल्या आठवड्यात त्यांचा ट्रोल करणाराअंदाजही आपण पाहिला. पण काँग्रेस पुढची निवडणूकजिंकली, तर राहुल गांधी पंतप्रधान कार्यालयात कायनवीन विचार घेऊन येतील, याबद्दल देशात अजूनहीस्पष्टता नाही. आतापर्यंत त्यांनी धर्मनिरपेक्षतेपासून ते‘मोहब्बत की दुकान'', ‘पाच न्याय'', जातीनिहायजनगणना आणि आता विद्यार्थ्यांची आंदोलने अशाअनेक मुद्द्यांना आणि घोषणांना हाताळून पाहिले आहे. पण आगामी काळात राहुल गांधी यांच्यासमोरील सर्वातमोठे आव्हान ते स्वतःच आहेत. उपहास आणि तिखटटीकेला त्यांनी राजकारणाची ओळख बनवले आहे.आता ते ही शैली बदलून एक विश्वासार्ह राजकीयविचार मांडू शकतील का? याद्वारे 2029 मध्ये काँग्रेसएक उत्तम पर्याय म्हणून समोर येईल? ( लेखिकेच्या हे वैयक्तिक मत आहे.) राहुल गांधी यांनी आपण नेमक्या कोणतेविचार, धोरणांच्या बाजूने उभे आहोत, हेस्पष्टपणे सांगायला हवे. काँग्रेसचेसरकार आल्यास त्याचादेशवासीयांसाठी काय अर्थ असेल, हेत्यांनी मांडले पाहिजे. तरुणांसाठी हीबाब खूप महत्त्वाची आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




