भारत-बांगलादेश सीमा बेकायदेशीररीत्या ओलांडून छत्रपती संभाजीनगर शहरात आणि ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या दोन परदेशी नागरिकांचा पोलिसांच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. छत्रपती संभाजीनगर जवळील मांडकी शिवारातील एका ढाब्यावर कुक आणि वेटर म्हणून अत्यंत बेकायदेशीररीत्या काम करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना स्थानिक गुन्हे शाखा व चिकलठाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मोहम्मद बिलाल मोहम्मद मुकलिस्उद्दीन रेहमान (वय २७) आणि मोहम्मद रासेल मोहम्मद इरशाद अली (वय १९, दोघेही मूळ रा. झिनायदा, बांगलादेश, सध्या राहत. मांडकी शिवार, पळशी, छत्रपती संभाजीनगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. हे दोघेही भारताची सीमा कोणतीही कायदेशीर कागदपत्रे, पारपत्र (Passport) किंवा व्हिसाशिवाय अवैधरीत्या ओलांडून भारतात दाखल झाले होते. त्यानंतर दलालांच्या मदतीने ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आणि मांडकी शिवारातील एका इमानदार ढाब्यावर लपूनछपून कुक आणि वेटर म्हणून नोकरी करत होते. स्थानिक पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळताच, त्यांनी तातडीने सापळा रचून या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान सुरवातीला या दोघांनीही आपण भारतीय नागरिक असल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी अत्यंत कसून आणि तांत्रिक पद्धतीने चौकशी केल्यानंतर त्यांच्या मोबाईलची पाहणी केली असता, त्यात बांगलादेश सरकारचे राष्ट्रीय ओळखपत्र (National ID), जन्मप्रमाणपत्र आणि काही संशयास्पद चॅट्स व कागदपत्रे आढळून आली. या कागदपत्रानंतर त्यांचे खरे परदेशी नागरिकत्व उघड झाले. दलालांच्या माध्यमातून बनावट भारतीय ओळखपत्र तयार करून घेण्याचा त्यांचा कट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी फॉरेनर अॅक्ट (Foreigners Act) आणि संबंधित कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, त्यांना भारतात आणणारे व आश्रय देणारे रॅकेट किती मोठे आहे, याचा सखोल तपास आता पोलीस यंत्रणेकडून सुरू करण्यात आला आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




