नागपूर: वंदे मातरमचा अपमान हा भारताच्या संस्कृतीचा आणि राष्ट्रभक्तीचा अपमान आहे. राष्ट्रगीत आणि राष्ट्रभावनेशी संबंधित विषयांमध्ये कोणत्याही प्रकारचा अवमान सहन केला जाऊ नये. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. यासंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे कारवाईची मागणी करणार असल्याची ठाम भूमिका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे. सोमवारी ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
यावेळी बोलताना मंत्री बावनकुळे यांनी राष्ट्रगीताचा आणि राष्ट्रभावनेचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तींवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, देशाच्या अस्मितेशी आणि राष्ट्रीय प्रतीकांशी जोडलेल्या मुद्यांवर कोणीही तडजोड करू शकत नाही. अशा घटनांची गंभीर दखल घेऊन संबंधित दोषींवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणाचीही अशा प्रकारच्या कृत्याची पुनरावृत्ती करण्याची हिंमत होणार नाही.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर टीका: याच पत्रकार परिषदेत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचाही बावनकुळे यांनी तीव्र शब्दात निषेध केला. पृथ्वीराज चव्हाण हे एक ज्येष्ठ नेते आहेत, मात्र केवळ प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारची विधाने करणे त्यांच्याकडून अजिबात अपेक्षित नाही, असे ते म्हणाले. गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या आणि देशाच्या राजकारणात मोठे योगदान दिले असून पक्षाने त्यांना नेहमीच सर्वोच्च सन्मान दिला आहे.
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, जन्म आणि मृत्यू कोणाच्याही हातात नसतो. एखादी व्यक्ती आज हयात नसताना त्यांच्या निधनानंतर किंवा भूतकाळातील घटनांवर बोट ठेवून अशा पद्धतीने वक्तव्य करून आदराला गालबोट लावणे अत्यंत चुकीचे आहे. चव्हाण यांनी आपण कोणाबद्दल आणि कशासंदर्भात बोलत आहोत, याचे भान ठेवून व विचार करूनच वक्तव्य करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. याशिवाय निवडणुका आणि इतर राजकीय घडामोडींवरही त्यांनी आपली परखड मते मांडली.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




