मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाका सुरू; सिंधुदुर्गवासीयांच्या टोलमाफीबाबत संभ्रम कायम, स्थानिक वाहनांसाठी ३५० रुपयांचा मासिक पास लागू

मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित असलेल्या ओसरगाव (ता. कणकवली) येथील टोल नाक्यावर अधिकृतपणे टोल वसुलीला सुरुवात झाली आहे. महामार्ग प्राधिकरण विभागाने वाहननिहाय टोलचे दर निश्चित केले असून, त्यानुसार या टोल नाक्यावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, या टोल नाक्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक नोंदणी असलेल्या वाहनांना पूर्ण टोलमाफी मिळणार की नाही, याबाबत वाहनचालक व नागरिकांमध्ये अजूनही संभ्रमावस्था आणि संताप कायम असल्याचे दिसून येत आहे.

महामार्ग प्राधिकरणाच्या नियमांनुसार, जिल्ह्यातील स्थानिकांच्या अवाणिज्यिक (नॉन-कमर्शियल) वाहनांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी ३५० रुपयांचा मासिक पास काढावा लागणार आहे, तर इतर वाहनांना ठरवून दिलेल्या शुल्काच्या पन्नास टक्के टोल भरावा लागेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. तीन वर्षांपूर्वी जेव्हा या टोल नाक्यावर वसुलीचा प्रयत्न करण्यात आला होता, त्यावेळी तीव्र जनआंदोलन उभे राहिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रत्यक्ष टोल वसुली सुरू झाल्यामुळे वाहनचालकांमध्ये आणि स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात या विषयावरून उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *