तामिळनाडूचे भाजप प्रमुख नैनार नागेंद्रन यांनी एका प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली. इतकंच नव्हे तर संबंधित अभिनेत्रीनेही तीव्र संताप व्यक्त केला. नैनार यांनी ज्या अभिनेत्रीबद्दल टिप्पणी केली, ती त्रिशा कृष्णन आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्रिशा अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. राज्याच्या राजकारणात उच्च पदावर असलेल्या व्यक्तीकडून असं वक्तव्य केलं जाण्याची अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत त्रिशाने राग व्यक्त केला. तिने स्पष्टपणे सांगितलं की ती कोणत्याही प्रकारचा अनादर किंवा अपमानास्पद टिप्पणी सहन करणार नाही. आदराच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी थेट भूमिका तिने मांडली.
नैनार नेमकं काय म्हणाले?
अभिनयसृष्टीतून राजकारणात आलेल्या अभिनेता विजयची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न तमिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला. ते म्हणाले, “ज्या माणसाला छतावरही चढता येत नाही, तो स्वर्गात पोहोचण्याचं स्वप्न पाहत आहे. दुर्दैवाने तो खूपच भोळा आहे. त्याने आधी स्वत:च्या घरातून बाहेर पडावं. आधी त्रिशाच्या घरातून बाहेर पडावं, मग काहीतरी घडू शकेल.” या वक्तव्यातून नैनार यांनी थेट विजय आणि त्रिशाचं नाव जोडलं होतं.
Disrespect should and always will be called out. pic.twitter.com/FmXdIBvAJ6
— Trish (@trishtrashers) February 16, 2026
या वक्तव्यानंतर त्रिशाने तिच्या वकिलांमार्फत तिची स्पष्ट भूमिका मांडली. तिच्या वकिलाने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केलं. ज्यात म्हटलंय, ‘त्रिशा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही आणि राजकारणाबद्दलची तिची भूमिका पूर्णपणे तटस्थ आहे. त्रिशाला केवळ तिच्या कामासाठी, चित्रपटांसाठी आणि अभिनयासाठी ओळखलं जायचं आहे, कोणत्याही राजकीय अफवांसाठी नाही. त्यामुळे सार्वजनिक व्यासपीठावर एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याला चर्चेचा विषय बनवणं योग्य नाही. उच्च पदावर असलेल्यांनी त्यांचे शब्द काळजीपूर्वक निवडावेत, कारण त्यांच्या वक्तव्यांचा समाजावर प्रभाव पडतो. त्रिशाचं नाव तिच्याशी काहीही संबंध नसलेल्या प्रकरणांमध्ये ओढलं जाऊ नये.’
या पोस्टनंतर अखेर नागेंद्रन यांनी माफी मागली. ‘माझ्या राजकीय कारकिर्दीत मी कोणत्याही वैयक्तिक टिप्पण्यांना परवानगी देत नाही आणि मीसुद्धा अशा प्रकारची टिप्पणी करत नाही. पण त्यादिवशी मी तो नियम मोडला. मी जे काही बोललो, त्याबद्दल मला पश्चात्ताप आहे. के. अन्नामलाई यांनीही मला समजावून सांगितलं. त्यामुळे मी माफी मागतो’, असं ते म्हणाले.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




