नाशिक: कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली बनावट कागदपत्रे आणि खोटी 'वर्क ऑर्डर' देऊन तब्बल ३ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आणखी तीन संशयितांना अटक केली आहे. या कारवाईमुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या सहावर पोहोचली आहे.
नेमके काय प्रकरण आहे? सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाचा वापर करून काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी कंत्राटदारांना टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. आरोपींनी कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्या डिजिटल सहीचा गैरवापर करत बनावट लेटरहेडवर खोट्या वर्क ऑर्डर तयार केल्या होत्या. या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी अनेक कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली होती.
अशी उघडकीस आली फसवणूक: या संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश एका कंत्राटदाराच्या सतर्कतेमुळे झाला. छत्रपती संभाजीनगरमधील एका केटररला २७८ कोटी रुपयांची तीन टेंडर देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र, वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर त्यातील इंग्रजी स्पेलिंगमध्ये चुका दिसून आल्यामुळे तक्रारदाराला संशय आला. त्याने अधिक तपास केला असता, ही वर्क ऑर्डर पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांची धडक कारवाई: तक्रार मिळताच नाशिक रोड पोलिसांनी तातडीने चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले. यापूर्वी पोलिसांनी तनय महाजन, नरेंद्र महाजन आणि शोएब अहमद शेख यांना अटक केली होती. त्यानंतरच्या तपासात अब्दुल रईस अब्दुल मुनाफ शेख याला जामनेरजवळील परतखेडे येथून अटक करण्यात आली. तसेच, शकील अहमद सलीमुद्दीन शेख आणि मोहम्मद वसीम अब्दुल गफार या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की, हे प्रकरण पूर्णपणे गुन्हेगारी स्वरूपाचे असून संशयितांनी कंत्राटदारांना लुटण्यासाठी एक मोठे जाळे विणले होते. सध्या पोलीस या प्रकरणातील मास्टरमाईंडचा शोध घेत असून, एका जामनेरच्या नगरसेवकाचीही चौकशी केली जात आहे. या घोटाळ्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शहर
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
- मुंबई: आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न; अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याच्या नोटीसवर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर घणाघात!
- पुणे: पद हवंय, आधी कामाचं रिपोर्ट कार्ड दाखवा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पुण्यातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची कानउघडणी!
महाराष्ट्र
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
- रत्नागिरी: कोंबड्यांच्या खोलीत रात्रभर राहिला बिबट्या; सर्व कोंबड्या फस्त करत दरवाजा उघडणाऱ्या महिलेवर केला हल्ला!
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर



























Subscribe to my channel




