सुप्रिया सुळे, नरहरी झिरवळ, देवेंद्र फडणवीसImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Supriya Sule on Narhari Zirwal : मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखोरीमुळे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत सापडले आहे. या सर्व प्रकरणावर शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा सवाल उभा केला. मंत्रालयात एसीबीने जी कारवाई केली त्याअनुषंगाने काही सवाल उपस्थित केले आहे. त्यातून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. झिरवळांच्या खात्यातील लाचखोरीची टीप कुणी दिली असा सवाल करत त्यांनी या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आपल्याच घरात आपल्याच मंत्र्यांवर…
मुख्यमंत्री हे मंत्रालयाचे प्रमुख आहेत. मंत्री हा मंत्री असतो. त्याला पक्षात विभागू नका. ACB कारवाईचे रिपोर्टिंग कुणाला करत? तर मुख्यमंत्र्यांना करतं. मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावर बसतात. त्यांच्याकडे गृहमंत्रालय आहे. या गृहमंत्रालयानेच मंत्रालयातील तिसऱ्या,चौथ्या मजल्यावरील त्यांच्याच कॅबिनेटमधील मंत्र्याकडे एसीबी जाणं हे धक्कादायक नाही का? मग ही तक्रार केली कुणी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कुणीतरी टीप ऑफ दिला ना. हा टिप ऑफ कुणी दिला. स्वतःच्याच मंत्र्याला, मंत्रालयातच कारवाई होते. म्हणजे तुम्हीच तुमच्या मंत्र्यांवर रेड करता, छापा घालता. मुख्यमंत्री ज्या वास्तूत बसतात. त्यात, त्यांच्या डोळ्यासमोर, त्याच मंत्र्यांच कार्यालय तुम्ही सील करता. हा मोठा धक्का आहे. आपल्याच घरात आपण आपल्याच माणसावर छापा घातला असा हा प्रकार आहे. टीप कुणी दिली. हे खरं आहे की खोटं आहे याची उत्तरं माझ्याकडं नाहीत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. डेटा आणि वास्तव नसल्यास मी त्यावर अधिक भाष्य करणे, बोलणे योग्य नाही. पण मंत्रालयात स्वतःच्याच मंत्र्यांवर असा छापा घालणं धक्कादायक आहे. जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असता तेव्हा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असता, पक्षाचे नसता. मंत्री हा पक्षाचा नसतो. तर तुमच्या कॅबिनेटचा असतो असं सांगत त्यांनी कार्यालय सील करणं यावर आणि या कारवाईमागे संशयाचा धूर असल्याचे इंगित केले.
तर अजितदादांच्या पक्षाची काय भूमिका आहे याविषयी आपण काही सांगू शकत नसल्याचे त्या म्हणाल्या. झिरवळांना सुनेत्रा पवार यांनी समज दिली नाही दिली याविषयी मी सांगू शकत नाही. झिरवळांसोबत मी काम केलं आहे. ते शून्यातून वर आले आहे. त्यामुळे झिरवळांबाबत जो आरोप केला जात आहे, त्याबाबत पारदर्शकपणे चौकशी व्हावी आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्टीकरणं द्यायला हवं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. मी झिरवळांना अनेक दिवसांपासून ओळखते. छगन भुजबळ आणि नबाब मलिक जेव्हा अडचणीत आले ,तेव्हा मी त्यांच्यासोबत होते. आम्ही एकमेकांच्या सुख-दुःखात सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
[embedded content]
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




