महाराष्ट्र: सरकारच्या महसूल विभागाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या हिताचा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा (७/१२) उताऱ्यावर नाहीत किंवा तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या नोंदी अद्ययावत नाहीत, अशा शेतकऱ्यांना आता अधिकृत रेकॉर्डवर आणले जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकत्याच मंत्रालयात झालेल्या बैठकीत ही घोषणा केली.
२ लाख ३१ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ: राज्यात तब्बल २ लाख ३१ हजार शेतकरी असे आहेत ज्यांचे 'ॲग्रीस्टॅक' निघत नाही. यामुळे त्यांना पीककर्ज आणि कर्जमाफी यांसारख्या महत्त्वाच्या सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागत होते. यातील ५० हजार शेतकरी मयत असून त्यांच्या वारसांच्या नावावर नोंदी नाहीत, तर १० हजार प्रकरणांत जमीन वडिलांच्या नावे असून मुलांच्या नावावर सातबारा झालेला नाही. या सर्व त्रुटी दूर करून आता त्यांना 'फार्मर आयडी' (Farmer ID) दिला जाणार आहे.
काय आहे नवीन प्रक्रिया? महसूलमंत्र्यांच्या निर्देशानुसार, अशा शेतकऱ्यांकडून जमिनीची इतर अधिकृत कागदपत्रे गोळा केली जाणार आहेत. या प्रक्रियेसाठी एक स्वतंत्र फॉरमॅट तयार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना १५ दिवसांच्या आत संबंधित शेतकऱ्यांची माहिती आणि अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे जमिनीच्या मालकीचे पुरावे सादर करून शेतकरी शासकीय रेकॉर्डवर येऊ शकणार आहेत.
विशेष तरतूद (देवस्थान आणि इनाम जमीन): ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी देवस्थान, इनाम किंवा वतन वर्गातील आहेत, त्यांनाही या प्रक्रियेत समाविष्ट करून विशेष फॉर्मद्वारे त्यांना फार्मर आयडी दिला जाणार आहे. यामुळे या जमिनींवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही भविष्यात सर्व शासकीय सुविधा आणि सवलती सहज उपलब्ध होतील.
पुढील पाऊल: सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे ज्यांचे ॲग्रीस्टॅक निघत नाही, त्यांच्यासाठी पर्यायी कागदपत्रांचा आधार घेऊन मार्ग काढला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील कृषी क्षेत्रातील गोंधळ कमी होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
शहर
- पुणे: परंपरा आणि नियमांचा समतोल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांसाठी नियमावली तयार करण्याचे महापौरांचे आदेश!
- नागपूर: मोठा अनर्थ टळला गडचिरोलीला जाताना मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड!
- मुंबई: एका ध्येयवेड्या प्रवासाचा दुर्दैवी अंत २४ वर्षीय 'स्टार बायकर' रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमध्ये भीषण अपघातात मृत्यू!
- पुणे: "ओव्हरटेकच्या नादात वेगाने आलेल्या टेम्पोने उडवले; शिक्रापूरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या कामगाराचा जागीच मृत्यू."
महाराष्ट्र
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- पुणे: परंपरा आणि नियमांचा समतोल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांसाठी नियमावली तयार करण्याचे महापौरांचे आदेश!
- नागपूर: मोठा अनर्थ टळला गडचिरोलीला जाताना मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड!
- मुंबई: एका ध्येयवेड्या प्रवासाचा दुर्दैवी अंत २४ वर्षीय 'स्टार बायकर' रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमध्ये भीषण अपघातात मृत्यू!
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी; ठाकरेंच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, संजय राऊतांना न्यायाची खात्री."
- कर्नाटक: "आरोग्यासाठी मोठा निर्णय! गुटखा, पान मसाल्यावर १ वर्षाची पूर्ण बंदी; उत्पादन अन् साठवणुकीवरही निर्बंध."
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ

























Subscribe to my channel




