सिंधुदुर्ग: सावंतवाडी तालुक्यातील कुंभवडे धबधब्याचे पर्यटन थांबवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) बैठकीत घेण्यात आला. पर्यटकांच्या गैरवर्तनामुळे गावातील शांतता आणि सुरक्षा धोक्यात आल्याने हा निर्णय झाला आहे. सावंतवाडी तालुक्यातील कुंभवडे (बाबा) धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकांचा हुल्लडबाजी, वाहतूक कोंडी आणि दारूचा धिंगाणा वाढल्याने चौकुळ ग्रामस्थ अत्यंत आक्रमक झाले आहेत. गेल्या रविवारी वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या ग्रामस्थांना पर्यटकांनी चक्क दंडुके आणि छोट्या कुऱ्हाडी दाखवून घाबरविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या गंभीर घटनेनंतर ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने संयुक्त बैठक घेऊन चौकुळ गावातून कुंभवडे धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकांना ३० ऑगस्टपर्यंत पूर्णपणे प्रवेशबंदी करण्याचा धडक निर्णय घेतला आहे.सरपंच गुलाबराव गावडे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत पर्यटकांच्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत चर्चा झाली. "शांतता, सुरक्षितता आणि ग्रामस्थांचा सन्मान धोक्यात आणणारे पर्यटन आम्हाला नकोच," अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी ३० ऑगस्टपर्यंत या मार्गाने न येण्याचे आवाहन पर्यटकांना केले आहे. ३० ऑगस्टनंतर पर्यटनाबाबत अधिक कडक नियमावली निश्चित केली जाणार आहे.
हत्यारे दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना पर्यटकांनी हातात दंडुके व छोट्या कुऱ्हाडीसदृश हत्यारे दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.
कचरा, दारूच्या बाटल्या अन् महिलांना त्रास
रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करणे, दारू पिऊन बाटल्या फोडणे आणि ये-जा करणाऱ्या महिलांना त्रास देण्याच्या प्रकारांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. त्यामुळे गावाची शांतता भंग करणाऱ्या पर्यटनाला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले गेले.
३० ऑगस्टनंतर कडक नियमावली लागू होणार
ग्रामस्थांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे कुंभवडे धबधब्याच्या पर्यटन व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ३० ऑगस्टनंतर चौकुळमार्गे पर्यटन सुरू ठेवायचे की नाही आणि ठेवायचे असल्यास कोणते कडक निर्बंध लादायचे, याचा अंतिम निर्णय घेतला जाईल.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



