पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या

पुणे: जेजुरी पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे येथे १० वर्षांच्या अल्पवयीन चिमुकलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. झुंबर सिताराम खोमणे (वय ६०, रा. कोळविहीरे, ता. पुरंदर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास कोळविहीरे गावाच्या हद्दीतील दिलीप खैरे यांच्या सीताफळाच्या बागेत ही घटना घडली. बालिका अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही आरोपी झुंबर खोमणे याने तिला फसवून बागेत नेले व तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित बालिकेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेजुरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ (१), ६४ (२) (i), ६४ (२) (k), ६५(२), ३५१ (२) (३) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलम ४ आणि ६ अंतर्गत गुन्हा (गु. र. नं. २२७/२०२६) नोंदवण्यात आला आहे.

 

 

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता राणे करत असून, जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे.

Disclaimer: या पोस्टमधील माहिती उपलब्ध वृत्तस्रोत व अधिकृत माहितीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे. तपास किंवा अधिकृत प्रक्रियेनुसार तथ्यांमध्ये बदल होऊ शकतो.
या पोस्टचा उद्देश केवळ माहिती देणे असून अंतिम सत्यता संबंधित शासकीय यंत्रणा व न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *