पुणे: मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीला यंदाच्या आर्थिक वर्षात मोठी गती मिळाली असून, एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीत रेल्वेने विक्रमी कामगिरी केली आहे. या काळात रेल्वेने २७.६५ दशलक्ष टन मालाची यशस्वी वाहतूक करत तब्बल २ हजार ७७७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत मालवाहतुकीच्या प्रमाणात ४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
महत्त्वाचे आकडे: मध्य रेल्वेने या चार महिन्यांत १०,४९८ रेकच्या माध्यमातून मालाची वाहतूक केली. गेल्या वर्षी याच काळात १०,०५५ रेकद्वारे २६.४९ दशलक्ष टन मालाची वाहतूक झाली होती. यंदा रेल्वेने ४४३ रेक अधिक चालवून मालवाहतुकीत १.१६ दशलक्ष टनांची भर घातली आहे.
विभागांनुसार कामगिरी: मध्य रेल्वेच्या विविध विभागांनी या उत्पन्नात मोलाचा वाटा उचलला आहे:
-
नागपूर विभाग: हा विभाग मालवाहतुकीत आघाडीवर असून, येथून १६.३१ दशलक्ष टन मालवाहतूक होऊन १,६६७.८७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
-
मुंबई विभाग: ६.८० दशलक्ष टन मालाची वाहतूक करत ६३४.५४ कोटी रुपये उत्पन्न मिळाले.
-
भुसावळ विभाग: १.६० दशलक्ष टन मालाची वाहतूक होऊन १८७.१९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
-
सोलापूर विभाग: २.३४ दशलक्ष टन मालाची वाहतूक होऊन १६३.८३ कोटी रुपये उत्पन्न मिळाले.
-
पुणे विभाग: पुणे विभागानेही उत्कृष्ट कामगिरी करत ६१ लाख टन मालाची वाहतूक केली असून, त्यातून १२३.७२ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.
कोळशाची सर्वाधिक वाहतूक: मध्य रेल्वेच्या एकूण महसुलात कोळशाचा वाटा सर्वाधिक म्हणजेच ४९ टक्के आहे. रेल्वेने ३,४४४ रेकद्वारे १३.५४ दशलक्ष टन कोळशाची वाहतूक केली, ज्यातून १,२२७.९९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. कोळशाव्यतिरिक्त कंटेनर (१३%), पेट्रोलियम पदार्थ (८%), सिमेंट (८%) आणि लोह व पोलाद (७%) यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
शहर
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
- पुणे: हट्टीपणा जीवावर बेतला! मित्र अन् पालकांचे कोणाचेही ऐकले नाही, भयंकर अपघातात चौघांनी गमावला जीव
- कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद
- मुंबई: घाटकोपरमध्ये दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
- पुणे: हट्टीपणा जीवावर बेतला! मित्र अन् पालकांचे कोणाचेही ऐकले नाही, भयंकर अपघातात चौघांनी गमावला जीव
- कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद
- सोलापूर: अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळल्याने १३ विद्यार्थी आणि २ शिक्षक जखमी
गुन्हा
- कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद
- पुणे: नीरा शहरात एटीएम फसवणुकीचा सुळसुळाट; बँका आणि यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
























Subscribe to my channel



