मुंबई:राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने (GAD) उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या कार्यालयांमध्ये तसेच त्यांच्या शासकीय निवासस्थानी छापील (Print) वृत्तपत्रे व नियतकालिके बंद करून केवळ ऑनलाइन (ई-पेपर) वर्गणी घेण्याचा निर्णय अवघ्या २४ तासांत अंशतः मागे घेतला आहे. गुरुवारी ३० जुलै रोजी काढलेल्या शासन निर्णयात शुक्रवारी ३१ जुलै रोजी सुधारणा करण्यात आली असून, आता मंत्री कार्यालयांना त्यांच्या सोईनुसार छापील किंवा ई-पेपर विकत घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
काय होता सरकारचा मूळ निर्णय?
३० जुलै रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक शासन निर्णय (GR) जारी केला होता. त्यानुसार, १ सप्टेंबर २०२६ पासून सर्व उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या कार्यालयात आणि शासकीय बंगल्यांवर मध्यवर्ती पद्धतीने केली जाणारी छापील वर्तमानपत्रे व नियतकालिकांची पुरवठा व्यवस्था बंद करण्यात येणार होती. वाढता खर्च कमी करण्यासाठी मंत्री कार्यालयांनी केवळ डिजिटल/ऑनलाइन सदस्यता (Subcription) घ्यावी आणि त्याचे बिल प्रशासकीय विभागाकडून मंजूर करून घ्यावे, असा आदेश देण्यात आला होता. विशेष म्हणजे या नियमातून केवळ मुख्यमंत्री कार्यालयाला वगळण्यात आले होते.
२४ तासांत का घ्यावा लागला यू-टर्न?
सरकारच्या या निर्णयावर सर्वच स्तरातून आणि वृत्तपत्र संघटनांकडून तीव्र टीका व विरोध सुरू झाला होता. कोट्यवधी रुपये जाहिरातींवर खर्च करणारे सरकार वर्तमानपत्रांचा अवघा काही लाखांचा खर्च वाचवण्यासाठी अशी बंदी घालत असल्याचा आरोप झाला. चौफेर दबाव आणि विरोध लक्षात घेता सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी (३१ जुलै) तातडीने सुधारित आदेश जारी केला.
सुधारित आदेशात काय म्हटले आहे?
सुधारित परिपत्रकानुसार, ३० जुलैच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ३ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. आता उपमुख्यमंत्री, मंत्री व राज्यमंत्री यांच्या कार्यालयांना तसेच निवासस्थानांना त्यांच्या सोईनुसार "ऑनलाइन किंवा छापील (Print) वर्तमानपत्रे व नियतकालिके" घेण्याची पूर्ण मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे मंत्री कार्यालयातील वर्तमानपत्रांचा पुरवठा पूर्वीप्रमाणेच सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहर
- पुणे: नवले पुलाखाली वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली; पोलिसांसमोरच झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन सुरू
- मुंबई: ठाण्यातील ॲमेझॉन एआय डेटा सेंटर आणि रिंग मेट्रो प्रकल्पांचा फेरविचार करा; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- पुणेः आंबेगाव बुद्रुक परिसरात वर्गमित्रांकडून १५ वर्षीय शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला; दोन अल्पवयीन ताब्यात!
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
महाराष्ट्र
- अंबरनाथ: पालिकेची सभा सुरू असताना नाट्यगृहाबाहेर कारमध्ये सापडली तलवार व शस्त्रे; दोघांना ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ
- मुंबई: मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी आणि मिनी राजस्थान; भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
- पुणे: नवले पुलाखाली वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली; पोलिसांसमोरच झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन सुरू
- बुलढाणा: शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बुलढाण्यात महामोर्चा; हेक्टरी १ लाखांच्या मदतीसह विविध मागण्यांसाठी ठाकरे सेना आक्रमक
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




