नाशिक: राज्यभरात प्रचंड गाजत असलेल्या नाशिकमधील बहुचर्चित 'म्हाडा' (MHADA) आणि भूखंड फसवणूक प्रकरणात शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. भूमी अभिलेख कार्यालयाचे बनावट मोजणी नकाशे, खोटे फेरफार दस्तऐवज आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे म्हाडासह शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक तहसील कार्यालयातील दोन आजी-माजी मंडल अधिकाऱ्यांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी दोघांनाही ३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अटक करण्यात आलेले संशयित: अटक करण्यात आलेल्यांमध्ये नाशिक तहसील कार्यालयात सध्या कार्यरत असलेले मंडल अधिकारी दिलीप कचरू वामन आणि निवृत्त मंडल अधिकारी श्याम एकनाथ बोरसे यांचा समावेश आहे. या अटकेच्या कारवाईमुळे महसूल आणि भूमी अभिलेख विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तपासात समोर आलेले गंभीर आरोप: शहर गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, संशयित दिलीप वामन आणि श्याम बोरसे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत विकासक, जमीनमालक आणि गुंतवणूकदारांशी संगनमत केले. त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाचे बनावट मोजणी नकाशे, हिस्सा फॉर्म क्रमांक ४ व १२, गटबुक तसेच जुन्या कागदपत्रांची कोणतीही कायदेशीर पडताळणी न करता त्यावर प्रत्यक्ष कारवाया केल्याचे निष्पन्न झाले आहे.
तहसील कार्यालयाचे कोणतेही अधिकृत आदेश किंवा पत्र नसतानाही १४ सर्व्हे व गटांमधील फेरफार नोंदी बेकायदेशीररीत्या मंजूर आणि प्रमाणित केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.
म्हाडाचे नियम डावलण्यासाठी कृत्रिम भूखंड विभाजन: राज्य शासनाच्या २०१३ च्या सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणानुसार, ४,००० चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडांवर २० टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, विकासकांना फायदा पोहोचवण्यासाठी आणि म्हाडाचा २० टक्के आरक्षणाचा नियम टाळण्यासाठी बनावट मोजणी नकाशे, खोटे आकारफोड पत्रके सादर करून भूखंडांचे कृत्रिम व बेकायदेशीर विभाजन करण्यात आले. यामुळे म्हाडा आणि राज्य सरकारचे प्रचंड आर्थिक व कायदेशीर नुकसान झाले.
पूर्वीही झाल्या आहेत अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या अटका: या बहुचर्चित म्हाडा फसवणूक प्रकरणात विशेष तपास पथकाकडून (SIT) सखोल चौकशी सुरू असून आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी बांधकाम व्यावसायिक सोनू मनवानी, दीपक करमचंदाणी, नायब तहसीलदार नितीन पाटील, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपिन काजळे, महापालिकेचे सहायक संचालक कल्पेश पाटील आणि भूमापन परीक्षक श्रीकांत परदेशी आदींना अटक करण्यात आलेली आहे. या सर्व प्रकारात आणखी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धागेदोरे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
शहर
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!


























Subscribe to my channel



