सांगली:कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणाची उंची ५२४.२६ मीटरपर्यंत वाढवून कृष्णा पाणी वाटप तंटा लवादाच्या (Krishna Water Disputes Tribunal) निर्णयाचे, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे थेट आणि उघड उल्लंघन केले आहे. कर्नाटकच्या या एकतर्फी व मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, असे स्पष्ट व आक्रमक आवाहन निवृत्त जलसंपदा अधिकारी तथा जलतज्ज्ञ प्रभाकर केंगार यांनी केले आहे.
नक्की काय आहे वाद?
कृष्णा नदीच्या पाणी वाटपावरून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. जलतज्ज्ञ केंगार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा नदीच्या खोऱ्यात कोणताही नवीन प्रकल्प हाती घ्यायचा असल्यास किंवा विद्यमान धरणाची साठवण क्षमता अथवा उंची वाढवायची असल्यास कृष्णा पाणी वाटप तंटा लवादाची पूर्वमान्यता घेणे कायदेशीररीत्या अनिवार्य आहे.
परंतु, कर्नाटक सरकारने कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता आणि कायदेशीर चौकटीचे उल्लंघन करत आलमट्टी धरणाची उंची ५२४.२६ मीटरपर्यंत वाढवण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे.
पश्चिम महाराष्ट्रावर महापुराचे संकट:
कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे सांगली, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा नदीकाठच्या भागांना मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात आलमट्टी धरणातील पाणीसाठा वाढल्यास आणि मागील बाजूस पाण्याचा फुगवटा (Backwater) निर्माण झाल्यास सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये अत्यंत भीषण महापुराची परिस्थिती निर्माण होते. कर्नाटकच्या मनमानीमुळे सांगली आणि कोल्हापूरच्या नागरिकांवर दरवर्षी महापुराची टांगती तलवार राहते.
सर्वोच्च न्यायालयात जाण्याची गरज:
प्रभाकर केंगार यांनी नमूद केले की, कर्नाटकने लवादाचे नियम धाब्यावर बसवून हा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यावर आणि सुरक्षेवर गदा येत आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने मूळ याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले पाहिजे आणि कर्नाटकच्या बेकायदेशीर कामांना त्वरित स्थगिती मिळवली पाहिजे.
महाराष्ट्र सरकारने या विषयाकडे गांभीर्याने न पाहिल्यास भविष्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेती, उद्योग आणि जनजीवन या सर्वांवरच अत्यंत गंभीर आणि विपरीत परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहर
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- पुणे: १५ ऑक्टोबरपूर्वी किंवा त्यापूर्वीही सुरू करता येणार ऊस गाळप हंगाम; साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
महाराष्ट्र
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- वर्धा: महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात निलंबित विद्यार्थ्यांसाठी तीव्र आंदोलन; प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ
- पुणे: लक्ष्मी रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला भीषण आग; ७ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल, मोठी दुर्घटना टळली
- कोल्हापुर: बिबट्याची दहशत! फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर उसाच्या शेतात शिरला बिबट्या, थर्मल ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!



























Subscribe to my channel



