बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल

बदलापूर: एका साडीवरून झालेल्या क्षुल्लक वादातून पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमधील शिरगावात उघडकीस आली आहे. पतीने साडी घेऊन दिली नाही या कारणावरून संतापलेल्या पत्नीने आधी पतीच्या डोक्यात प्रेशर कुकर मारला आणि त्यानंतर गळा घोटून त्याला जिवे मारले. या भयंकर घटनेने संपूर्ण बदलापूर परिसर हादरून गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरातील शिरगावात राहणारे हरेराम सिंग आणि सुनीता देवी यांच्यात संध्याकाळी साडेसातच्या सुमारास वाद झाला. हा वाद पतीने साडी न दिल्यावरून सुरू झाला होता. हरेराम हा अपंग असल्यामुळे तो अंथरुणावरच असतो. यादरम्यान संतापलेल्या सुनीतादेवीने हरेरामच्या डोक्यात कुकर मारून त्याचा गळा घोटला. या दोघांमध्ये यापूर्वीही अनेकदा वाद झाल्याचे समोर आले आहे.

घटनेच्या वेळी त्यांचा सात वर्षांचा चिमुकला मुलगा देखील घरातच उपस्थित होता. सुरुवातीला आरोपी महिलेने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती दिली होती. मात्र, पोलिसांनी सात वर्षांच्या मुलाचा जबाब नोंदवताच संपूर्ण सत्य बाहेर आले. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी पत्नी सुनीतादेवीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. हा खून केवळ साडीच्या कारणावरूनच झाला की यामध्ये इतर काही कारण आहे, तसेच यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *