छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे

छत्रपती संभाजीनगर: "माझ्या बहिणीने आत्महत्या केली नसून, सासरच्या त्रासानेच तिचा बळी घेतला आहे", असा संतप्त आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे ८ वर्षे आणि अवघ्या अडीच वर्षांची दोन चिमुकली मुले आईच्या मायेच्या छत्रछायेला कायमची पारखी झाली आहेत.

नेमकी घटना काय?
कोमल योगेश मोरे (वय ३०, रा. बजाजनगर) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, कोमलचा विवाह २०१६ मध्ये संगणक अभियंता योगेश मोरे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवस सर्वकाही ठीक चालले होते. मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींकडून तिचा सतत छळ सुरू झाला, असा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.

 

पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कोमलचे सासरे रेवनाथ मोरे यांनी कोमलच्या वडिलांना फोन करून "कोमल उठत नाहीये, ती बेशुद्ध आहे," असे सांगितले. ही बातमी ऐकताच कोमलचे वडील आणि भाऊ डॉ. कृष्णा पवार यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

चिमुकल्यांचे अश्रू पाहावेना
आई निघून गेल्याचे भानही नसलेली लहान मुले जेव्हा घरभर आईला शोधत होते, ते दृश्य पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. या प्रकरणी माहेरच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *