हैदराबाद: आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात एका अत्यंत क्रूर आणि सुनियोजित हत्येचा प्रकार समोर आला आहे. अमावस्येनिमित्त देवदर्शनासाठी मंदिरात जाण्याचे निमित्त करून एका १९ वर्षीय विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा 'काटा' काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नेमकी घटना काय?
मयत २३ वर्षीय रमेश हा तामिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यातील सुलागिरीचा रहिवासी होता आणि होसूरमधील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याचा विवाह दोन वर्षांपूर्वी १९ वर्षीय हसिनीशी झाला होता. त्यांना एक लहान मुलगीही आहे. मात्र, हसिनीचे तिचे बालमित्र २० वर्षीय युगंधर याच्याशी विवाहानंतरही प्रेमसंबंध सुरू होते. त्यांच्या या नात्यात पती रमेश अडथळा ठरत असल्याने हसिनी आणि युगंधरने त्याला कायमचे संपवण्याचा कट रचला.
कट कसा आखला?
मंगळवारी हसिनीने रमेशला मल्लप्पा कोंडा डोंगरावरील श्री मल्लेश्वर स्वामी मंदिराच्या दर्शनासाठी तयार केले. प्रवासादरम्यान ती तिचे 'लाईव्ह लोकेशन' सातत्याने प्रियकर युगंधरला पाठवत होती, जेणेकरून हल्लेखोरांना त्यांचा माग काढता येईल. डोंगराळ रस्त्यावरील तिसऱ्या वळणावर हसिनीने जाणूनबुजून आपली बॅग खाली पाडली, त्यामुळे रमेशला दुचाकी थांबवावी लागली. हीच संधी साधून लपून बसलेले युगंधर आणि त्याचे साथीदार बाहेर आले. त्यांनी रमेशचा जंगलात १०० मीटरपर्यंत पाठलाग केला आणि धारदार शस्त्राने त्याची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे, हत्येच्या वेळी त्यांची लहान मुलगी जवळच होती.
पोलीस तपास आणि सीसीटीव्ही
रमेश आणि हसिनी घरी परतले नाहीत म्हणून हसिनीच्या आईने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तपास सुरू केला असता, मंदिराच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये रमेश पत्नीसोबत दुचाकीवरून जाताना दिसला, पण नंतर हसिनी पतीच्याच दुचाकीवरून दोन अनोळखी पुरुषांसोबत निघून जाताना दिसली. यावरून पोलिसांना संशय आला. फोन रेकॉर्ड आणि लोकेशन डेटाच्या आधारे पोलिसांनी जंगलातून रमेशचा मृतदेह हस्तगत केला. अखेर पोलिसांनी पत्नी हसिनी, तिचा प्रियकर युगंधर आणि इतर दोन साथीदारांना अटक केली.
तसेच, हसिनीच्या लग्नाच्या वेळी ती अल्पवयीन होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत. हे सिद्ध झाल्यास बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गतही स्वतंत्र कारवाई केली जाईल.
शहर
- "गणेश मूर्ती विसर्जनावरून पुन्हा वाद! उंच 'पीओपी' मूर्तींचे जलस्रोतांत विसर्जन नको; राज्य सरकारच्या धोरणावर हायकोर्टाचे खडेबोल"
- मुंबई: प्रसिद्ध 'महेश ट्युटोरियल्स' चे ३३ क्लासेस अचानक बंद, हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
- पुणे: ६ कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, नायजेरियन 'बेनी' मास्टरमाइंड; आंतरराष्ट्रीय टोळीचे धक्कादायक कनेक्शन
- सातारा: शाळेच्या स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन गॅस गळती; चौघांची प्रकृती बिघडली, मोठा अनर्थ टळला
महाराष्ट्र
- "गणेश मूर्ती विसर्जनावरून पुन्हा वाद! उंच 'पीओपी' मूर्तींचे जलस्रोतांत विसर्जन नको; राज्य सरकारच्या धोरणावर हायकोर्टाचे खडेबोल"
- मुंबई: प्रसिद्ध 'महेश ट्युटोरियल्स' चे ३३ क्लासेस अचानक बंद, हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
- पुणे: ६ कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, नायजेरियन 'बेनी' मास्टरमाइंड; आंतरराष्ट्रीय टोळीचे धक्कादायक कनेक्शन
- सातारा: शाळेच्या स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन गॅस गळती; चौघांची प्रकृती बिघडली, मोठा अनर्थ टळला
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पैशांच्या वादातून आईची कारमध्ये गळा आवळून हत्या, १४ महिन्यांच्या बालकाला नदीत फेकले
- नागपूर: 'आई-वडील वेगळे होऊ शकतात, पण जबाबदारी नाही ' खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
- नांदेड: मृत्यूपूर्वी शिक्षकाचा WhatsApp स्टेटस चर्चेत; चार शिक्षण अधिकाऱ्यांवर संशयाची सुई
- मुंबई: '12 लाख द्या, नवऱ्याला सोडते' प्रेयसीची पत्नीकडे मागणी; धक्कादायक प्रकरण पोलिसांत
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- "सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर काँग्रेसचा अखेर पाठिंबा; प्रकृती खालावल्याने उपोषण मागे घेण्याचे आवाहन"
- पश्चिम बंगाल: भरधाव ट्रेनची शाळेच्या वाहनाला भीषण धडक; विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
- इस्रोचे महत्त्वाचे धोरण बदल: 'गगनयान'सारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यावर निर्बंध; नोकरशाहीचा निर्णय
- पंख उधार घेऊन भरारी घेता येत नाही; आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नासाठी स्वदेशी पंखांची गरज!

























Subscribe to my channel



