कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील उड्डाणपुलाखाली रात्रीच्या वेळी झोपलेल्या एका महिलेच्या सहा महिन्यांच्या बाळाचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कल्याण शहर आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फिर्यादी रोशनी सूरज साहू (२१, रा. सिलवासा, दादरा आणि नगर हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महात्मा फुले चौक (एमएफसी) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना: फिर्यादी रोशनी साहू काही कामानिमित्त गुजरातहून कल्याणात आल्या होत्या. सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्या कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील उड्डाणपुलाखाली आपल्या सहा महिन्यांच्या मुलासोबत विश्रांतीसाठी थांबल्या होत्या. रात्रीचा प्रवास आणि थकव्यामुळे त्यांना गाढ झोप लागली. याच संधीचा फायदा घेत अज्ञात अपहरणकर्त्याने त्यांच्या कुशीत झोपलेल्या बाळाला उचलले आणि तिथून पलायन केले. एवढेच नव्हे तर, आरोपीने जाताना मातेचा मोबाईल फोनदेखील चोरून नेला आहे.
पहाटे जाग येताच थरकाप: मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास रोशनी यांना जाग आली, तेव्हा त्यांना आपले बाळ आणि मोबाईल दोन्हीही जागेवर नसल्याचे दिसले. आपल्या चिमुरड्याला चोरीला गेल्याचे समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी आजूबाजूला बाळाचा शोधाशोध केला, पण बाळ मिळून आले नाही. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने थेट महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली.
पोलीस तपास आणि कारवाई: या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३७ (२) आणि ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास मडके या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपीने महिलेचा मोबाईल चोरल्यामुळे तांत्रिक तपास करणे पोलिसांना सोपे जाणार आहे. रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, गुन्हे शाखा, लोहमार्ग पोलीस आणि एमएफसी पोलीस अशी चार पथके बाळाचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत. आरोपी हा एकटा नसून त्याचे साथीदार असावेत, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
शहर
- सातारा: शाळेच्या स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन गॅस गळती; चौघांची प्रकृती बिघडली, मोठा अनर्थ टळला
- सांगली: बसमध्ये १२ किलो गांजा जप्त, पोलिसांची मोठी कारवाई, तस्करीचे धागेदोरे तपासात
- छत्रपती संभाजीनगर: शिक्षिकेवर अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पीएसआय हरीश खटावकरवर गुन्हा दाखल
- छत्रपती संभाजीनगर: पैशांच्या वादातून आईची कारमध्ये गळा आवळून हत्या, १४ महिन्यांच्या बालकाला नदीत फेकले
महाराष्ट्र
- सातारा: शाळेच्या स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन गॅस गळती; चौघांची प्रकृती बिघडली, मोठा अनर्थ टळला
- सांगली: बसमध्ये १२ किलो गांजा जप्त, पोलिसांची मोठी कारवाई, तस्करीचे धागेदोरे तपासात
- छत्रपती संभाजीनगर: शिक्षिकेवर अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पीएसआय हरीश खटावकरवर गुन्हा दाखल
- छत्रपती संभाजीनगर: पैशांच्या वादातून आईची कारमध्ये गळा आवळून हत्या, १४ महिन्यांच्या बालकाला नदीत फेकले
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पैशांच्या वादातून आईची कारमध्ये गळा आवळून हत्या, १४ महिन्यांच्या बालकाला नदीत फेकले
- नागपूर: 'आई-वडील वेगळे होऊ शकतात, पण जबाबदारी नाही ' खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
- नांदेड: मृत्यूपूर्वी शिक्षकाचा WhatsApp स्टेटस चर्चेत; चार शिक्षण अधिकाऱ्यांवर संशयाची सुई
- मुंबई: '12 लाख द्या, नवऱ्याला सोडते' प्रेयसीची पत्नीकडे मागणी; धक्कादायक प्रकरण पोलिसांत
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हैदराबाद: आंध्र प्रदेशात मंदिराच्या दर्शनाला जाण्याचा बहाणा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या
- "सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर काँग्रेसचा अखेर पाठिंबा; प्रकृती खालावल्याने उपोषण मागे घेण्याचे आवाहन"
- पश्चिम बंगाल: भरधाव ट्रेनची शाळेच्या वाहनाला भीषण धडक; विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
- इस्रोचे महत्त्वाचे धोरण बदल: 'गगनयान'सारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यावर निर्बंध; नोकरशाहीचा निर्णय























Subscribe to my channel



