
Pune : प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेची बचत करणारा व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनाने (महामेट्रो) तीन महत्त्वाच्या स्थानकांवरील नवीन प्रवेशद्वारे शनिवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये स्वारगेट मेट्रो स्थानक ते स्वारगेट एसटी स्थानक जोडणारा भुयारी मार्ग सुरू केला जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना वाहतुकीतून वाट काढत रस्ते ओलांडण्याची गरज कमी होऊन सुरक्षिततेत वाढ होणार आहे. शिवाय वेळ व श्रमाचीही बचत होणार आहे.
एसटीच्या प्रवाशांना थेट मेट्रोमध्ये प्रवेश
स्वारगेट चौकातून जीव मुठीत धरून भरधाव वाहनांमधून वाट काढत रस्ता ओलांडावा लागत होता. हे काम लवकर करावे, अशी मागणीदेखील केली जात होती. अखेर हे काम पूर्ण होऊन त्याला मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिली आहे. स्वारगेट मेट्रो स्थानक येथील प्रवेशद्वार क्रमांक पाच एसटी स्थानकाच्या बाजूला भुयारी मार्गाने उघडण्यात येणार आहे. एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट मेट्रोमध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे स्वारगेट परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे.
पुणे-मुंबई महामार्गाकडे प्रवेशद्वार
शिवाजीनगर मेट्रोस्थानक येथील प्रवेशद्वार क्रमांक तीन आकाशवाणी केंद्राजवळील भाऊसाहेब खुडे चौकात (सिमला ऑफिस) भुयारी मार्गाने सुरू होत आहे. गणेशखिंड रस्ता व कृषी महाविद्यालयाच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांना थेट स्थानकात पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे. या प्रवेशद्वारामुळे मुख्य रस्त्यासोबत मेट्रो स्थानक जोडले जाणार आहे; तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रोस्थानकावरील प्रवेशद्वार क्रमांक तीन पुणे-मुंबई महामार्गावर, पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर उघडण्यात येत आहे. त्यामुळे शहरातून स्थानकात येणाऱ्या; तसेच बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना रस्ता ओलांडण्याची आवश्यकता राहणार नाही.
"मेट्रोची वाढती प्रवासीसंख्या लक्षात घेऊन ही प्रवेशद्वारे सुरू करण्यात येत आहेत. विशेषतः मुख्य रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना या सुविधेचा मोठा लाभ होईल," असे महामेट्रोचे व्यवस्तापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितलं आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




