शिव्या नाथ यांचा कॉलम:वनांतील भूमिपुत्रांकडून शिकावे‎जीवनाशी जुळवून घेण्याचे तंत्र‎

‎‎‎‎‎‎‎‎अनेक संमिश्र, ऊन-सावलीसारख्या भावनांसह मी‎छत्तीसगडचा निरोप घेतला. या राज्यात मी जवळपास‎दोन आठवडे घालवले. या काळात रात्री उशिरापर्यंत‎साल वनस्पतीच्या दाट जंगलातून मोटारसायकलवरून‎प्रवास केला होता. चांदण्यात चमकणारी, पाने गळून‎गेलेली पांढरट भुताटकी झाडे एक विलक्षण दृश्य निर्माण‎करत होती. दुर्गम आदिवासी वस्तीपर्यंत पोहोचण्यासाठी‎वाहत्या नद्या पार कराव्या लागल्या.‎ बस्तर आणि कवर्धा येथील प्रवासात मी जंगलाच्या आत‎असलेल्या गोंड जमातीच्या गावात राहिले. तेथे‎वीजेसारखी मूलभूत सुविधाही नव्हती. नक्षलप्रभावित‎म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात मी यजमान‎कुटुंबासोबत शेकोटीजवळ बसून आदिवासी‎जीवनातील गुंतागुंत व त्याबाबत समाजात प्रचलित‎गैरसमज समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. धुरवा‎जमातीचे पारंपरिक उत्सव पाहिले.‎ एका पारंपरिक वैद्याच्या झोपडीत औषधी वनस्पतींसोबत‎पक्ष्यांचे पंजे व अनेक वर्षांपूर्वी जमा केलेले खवल्या‎मांजराचे खवलेही पाहायला मिळाले. दुर्गम गावांत धातू ‎‎आणि बांबूपासून हस्तकला करणाऱ्या कलाकारांना‎भेटले. त्यांचे असामान्य जीवन आणि दुर्मीळ कौशल्य‎‘इतर मागासवर्ग’ या सरकारी वर्गीकरणामागे जणू‎झाकोळून गेले आहे.‎ स्थानिक आदिवासी बाजारात तेंदूपानाच्या द्रोणात मला ‎‎लांदा हे तांदळापासून बनविलेले पारंपरिक पेय प्यायला ‎‎मिळाले. ते किंचित दाणेदार असते. एका विशाल‎मोहाच्या झाडाखाली बैगा जमातीच्या प्रेमळ कुटुंबाची‎भेट झाली. ते मोहाची दारू तयार करत होते. सकाळचा‎नाश्ता करून बराच वेळ झाला नसतानाही त्यांनी‎पानाच्या द्रोणातून त्या गरम आणि तीव्र पेयाची चव‎चाखल्याशिवाय मला जाऊ दिले नाही. आजही‎कपाळावर, हातांवर आणि पायांवर पारंपरिक गोंदण‎गोंदवून घेणाऱ्या बैगा समाजातील महिलांनाही भेटले.‎ त्या मातीच्या घरांत राहतात आणि अस्वल, बिबट्या,‎वाघ तसेच जंगलातील इतर प्राण्यांसोबत त्याच परिसरात‎आपले आयुष्य जगतात.‎त्या मातीच्या घरांत राहतात आणि अस्वल, बिबट्या,‎वाघ तसेच जंगलातील इतर प्राण्यांसोबत त्याच परिसरात‎आपले आयुष्य जगतात.‎ संध्याकाळी तीरथगड धबधब्याच्या प्रचंड वेगाने‎कोसळणाऱ्या पाण्याच्या तुषारांत उभे राहून मला‎अचानक स्वातंत्र्याचीविलक्षण अनुभूती आली होती. तो‎क्षण आणखी काही काळ अनुभवत राहावे, अशी‎मनापासून इच्छा झाली होती. मात्र, छत्तीसगडच्या‎आदिवासी समाजात वावरताना मनात एक खोल‎उदासीही सतत होती. कारण जुने विधी, पारंपरिक‎पोशाख, केशरचना, जंगल आणि आदिवासी हाटातील‎सामाजिक संवाद या सर्व गोष्टी आधुनिकतेच्या लाटेत‎हळूहळू वाहून जात आहेत. याकडे मात्र कुणाचे लक्ष‎दिसत नाही.‎ एकेकाळी भरड धान्य, कोदो, शेवगा आणि‎मोहासारख्या पौष्टिक पारंपरिक अन्नावर आधारलेला‎आदिवासींचा आहार आता तांदूळ आणि डाळीपुरता‎मर्यादित झाला आहे. परिणामी कुपोषण वाढले. जंगल‎आणि त्यातील संसाधनांचा शाश्वत तसेच‎‘शून्य-कचरा’ तत्त्वावर वापर करण्याचे त्यांचे समृद्ध‎पारंपरिक ज्ञानही हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.‎या समुदायांनी शतकानुशतके या अमूल्य जंगलांचे‎संरक्षण केले. त्यांनाच जंगलापासून दूर केले गेले आहे.‎वनसंरक्षणाच्या तथाकथित आधुनिक पद्धतींमुळे हा‎फटका बसू लागला आहे.‎ अनेक आदिवासी समाजांचा जंगलाशी असलेला‎पारंपरिक संबंधही आता तुटत चालला आहे. आदिवासी‎कुटुंबांसोबत राहताना, ताऱ्यांनी भरलेल्या‎आकाशाखाली एका ओझासोबत भोजन करताना आणि‎सामाजिकदृष्ट्या प्रगत परंपरांच्या कथा ऐकताना माझ्या‎मनात एकच विचार वारंवार येत राहिला. आदिवासी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎वडीलधाऱ्यांची आजची पिढी ही भारताच्या प्राचीन‎स्वदेशी ज्ञानपरंपरेचे जतन करण्याची आपल्याकडे‎उरलेली कदाचित शेवटची संधी आहे.‎ निसर्गाशी शाश्वत सहअस्तित्व कसे राखावे, हे ज्ञान‎त्यांच्याकडे आहे. या समुदायाच्या रक्तात आजही जंगल‎वाहते. अशा त्यांच्या मुलांना केवळ अकुशल मजूर‎बनविण्याऐवजी त्यांना निसर्गतज्ज्ञ, पर्यटन मार्गदर्शक‎आणि वनसंरक्षक म्हणून प्रशिक्षित करता येईल.‎ भौतिक लालसा आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाने ग्रासलेल्या‎या जगात छत्तीसगडच्या प्रवासाने मला पुन्हा एकदा‎जाणवून दिले की, ‘प्रगती’च्या दिशेने धावताना आपण‎वाटेत किती मौल्यवान गोष्टी गमावण्याचा धोका पत्करत‎आहोत.‎ (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)‎ भौतिक लालसा, पर्यावरणाच्या ऱ्हासाने‎ग्रासलेल्या या जगात छत्तीसगडच्या‎प्रवासाने मला पुन्हा एकदा जाणवून दिले‎की, ‘प्रगती’च्या दिशेने धावताना आपण‎वाटेत कितीतरी मौल्यवान गोष्टी‎गमावण्याचा धोका पत्करत आहोत.‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *