मुंबई: आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी लोकप्रिय असलेले डॅशिंग आयएएस (IAS) अधिकारी आणि राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता मुंबईतील अस्वच्छ आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या हॉटेल्सविरुद्ध आपला मोर्चा वळवला आहे. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या मुंबईतील तब्बल ६ बड्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांवर एफडीएने धडक कारवाई करत त्यांचे परवाने (लायसन्स) थेट निलंबित केले आहेत. मुंढे यांच्या या दणक्यामुळे मुंबईतील बड्या हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
आदित्य बिर्ला समूहाच्या रेस्टॉरंटवरही कारवाई
तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा दणका आदित्य बिर्ला समूहाशी संबंधित एका नामांकित रेस्टॉरंटलाही बसला आहे. नरिमन पॉइंट येथील 'फ्लिंट अँड वार्सा' (Flint & Varsa) या हायप्रोफाईल रेस्टॉरंटची २७ जून रोजी तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगचे (Misbranding) प्रकार आढळून आले. ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. याशिवाय १६ हजार २०१ रुपयांचे मुदतबाह्य (Expired) अन्नपदार्थही आढळून आले, जो साठा तात्काळ नष्ट करण्यात आला.
'या' हॉटेल्स आणि बेकरींवर झाली कारवाई:
१. हॉटेल गोपालकृष्ण (सांताक्रूझ पूर्व): या हॉटेलच्या थेट स्वयंपाकगृहात (किचनमध्ये) उंदीर फिरताना आढळून आले. ड्रेनेजमध्ये कचरा साचलेला होता आणि परिसरात मोठी दुर्गंधी पसरलेली होती.
२. कराक एंटरप्रायझेस (अंधेरी): या नामांकित ठिकाणी किचन आणि साठवणुकीच्या जागी झुरळांचा मोठा प्रादुर्भाव आढळला.
३. मद्रास डायरीज (वांद्रे): सेलेब्रिटीजच्या आवडीच्या वांद्रे परिसरातील या प्रसिद्ध हॉटेलमध्ये स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे उघड झाले.
४. एम. के. बेकरी (बोरीवली): या बेकरीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असतानाच, धूळ आणि कचऱ्यात अन्न उत्पादन सुरू होते. तसेच योग्य लेबल नसलेला संशयास्पद साठाही जप्त करण्यात आला.
५. हॉटेल श्रीकृष्ण (भांडुप): येथील फ्रिजची स्थिती अत्यंत निकृष्ट आणि आरोग्यास घातक होती, तसेच स्वच्छतेच्या अनेक त्रुटी आढळल्या.
नागरिकांना आवाहन:
नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा आस्थापनेला पाठीशी घातले जाणार नाही, असे एफडीएने स्पष्ट केले. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास किंवा कुठेही अस्वच्छता आढळल्यास नागरिकांनी त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन एफडीएने (FDA) केले आहे. यासाठी प्रशासनाने १८००२२२३६५ (1800222365) हा टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
शहर
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल; ११ ते १८ जुलै दरम्यान 'हे' मार्ग राहणार बंद.
- सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
महाराष्ट्र
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल; ११ ते १८ जुलै दरम्यान 'हे' मार्ग राहणार बंद.
- सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
गुन्हा
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
- वटपौर्णिमेच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपुरात शेतीपंप बंद करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी अंत.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
मनोरंजन
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- पश्चिम बंगालचा मोठा निर्णय! ओबीसी आरक्षणात बदल करणारी दोन महत्त्वाची विधेयके विधानसभेत मंजूर; १७% वरून ७% वर आरक्षणाची मर्यादा.
- जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! ऐतिहासिक वारसा जपणारी घरे आता बनणार 'हेरिटेज होमस्टे'; सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान.
- नासाची ऐतिहासिक 'रेस्क्यू' मोहीम! अवकाशात कोसळणाऱ्या 'स्विफ्ट' दुर्बिणीला वाचवण्यासाठी रोबोटिक यानाची मदत.






















Subscribe to my channel



