नाशिक: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आज एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची घडामोड घडत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकासमोर (SIT) हजर राहणार आहेत. या चौकशीसाठी त्या आज सकाळीच पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या आहेत.
वाटेत बदलली गाडी, नाट्यमय घडामोडी
मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली चाकणकर आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपल्या पुण्यातील निवासस्थानावरून बाहेर पडल्या. यावेळी माध्यमांचे लक्ष टाळण्यासाठी त्यांनी प्रचंड गोपनियता पाळल्याचे दिसून आले. पुण्यातून निघाल्यानंतर वाटेत त्यांनी ३ ते ४ वेळा आपली गाडी बदलली आणि काही वेळा थांबून त्या नाशिकच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. सकाळी १०:३० च्या सुमारास त्या नाशिकमधील एसआयटी कार्यालयात पोहोचण्याची शक्यता आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
अशोक खरात याच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत. खरातने स्थापन केलेल्या 'शिवनिका' या संस्थेच्या विश्वस्त मंडळावर रुपाली चाकणकर सलग दोन वेळा सदस्य होत्या. तसेच, खरातचे पाय धुतानाचे आणि त्यांचे गुणगान गातानाचे चाकणकर यांचे काही जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती.
चौकशीचे मुख्य मुद्दे:
१. राजकीय वरदहस्त: शिर्डीतील एका पीडित तरुणीच्या तक्रारीवेळी रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा वापर करून पोलिसांवर दबाव आणला आणि खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला का? याचा तपास SIT करणार आहे.
२. आर्थिक व्यवहार: चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर खरातच्या पतसंस्थेत काही संशयास्पद खाती आढळली आहेत. या आर्थिक व्यवहारांमध्ये रुपाली चाकणकर यांचा काही संबंध आहे का, याचीही पडताळणी केली जाणार आहे.
३. संस्थेचे सदस्यत्व: 'शिवनिका' संस्थेच्या माध्यमातून नेमके कोणते व्यवहार झाले आणि त्यात चाकणकरांची भूमिका काय होती, हे तपासले जाईल.
याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आजच्या या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते आणि यात आणखी कोणा बड्या नेत्यांची नावे समोर येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



