Franchise Scam in Chiplun: Spare Parts Businessman Defrauded of ₹10 Lakh

चिपळुणात फ्रँचायझीचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक; स्पेअर पार्ट व्यावसायिकाला गंडा, दोन संशयितांवर गुन्हा दाखल.

Franchise Scam in Chiplun: Spare Parts Businessman Defrauded of ₹10 Lakhचिपळूण: शहरात व्यवसाय वाढवण्याच्या उद्देशाने नामांकित कंपनीची फ्रँचायझी (Franchise) मिळवू पाहणाऱ्या एका स्पेअर पार्ट व्यावसायिकाला भामट्यांनी १० लाख २० हजार १७४ रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नेमके प्रकरण काय? चिपळूणमधील खेर्डी बाजारपेठेत राहणारे कौस्तुभ अविनाश अभ्यंकर हे स्पेअर पार्टचे व्यावसायिक आहेत. आरोपींनी कौस्तुभ यांच्याशी संपर्क साधून त्यांना एका नामांकित कंपनीची फ्रँचायझी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला सर्व काही अधिकृत वाटल्याने अभ्यंकर यांनी त्यांचा विश्वास ठेवला.

आरोपींनी अभ्यंकर यांना फ्रँचायझी प्रक्रियेच्या नावाखाली इंडियन ओव्हरसिज बँकेच्या एका खात्यात पैसे भरण्यास सांगितले. ५ मे ते २५ जून २०२६ या कालावधीत अभ्यंकर यांनी टप्प्याटप्प्याने एकूण १० लाख २० हजार १७४ रुपये संबंधित बँक खात्यात ट्रान्सफर केले.

फसवणूक कशी लक्षात आली? पैसे जमा केल्यानंतर आरोपींनी फ्रँचायझी देण्याबाबत टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. बराच कालावधी उलटूनही काहीही प्रतिसाद न मिळाल्याने आणि दिलेले पैसे परत न केल्याने अभ्यंकर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने चिपळूण पोलीस ठाणे गाठून अभय महाजन आणि प्रियांका सिंग या दोन संशयित व्यक्तींविरोधात रीतसर तक्रार दाखल केली.

 

सध्या चिपळूण पोलीस या प्रकरणाचा सायबर सेलच्या मदतीने अधिक तपास करत असून, अशा प्रकारे फ्रँचायझीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.



शहर

महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *