Congress Slams Centre Over NEET Paper Leak Row: Dr. Shama Mohamed Demands Education Minister Dharmendra Pradhan’s Resignation.

नीट पेपरफुटीवरून काँग्रेस आक्रमक: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची डॉ. शमा मोहम्मद यांनी केली मागणी.

Congress Slams Centre Over NEET Paper Leak Row: Dr. Shama Mohamed Demands Education Minister Dharmendra Pradhan’s Resignation.नागपूर: देशात वारंवार होणाऱ्या परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयाला धारेवर धरत, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नागपूर येथे 'छात्रों की गूंज' या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

 

 

नेमका आरोप काय?

डॉ. शमा मोहम्मद यांनी आरोप केला की, २०१४ मध्ये भाजप सत्तेत आल्यापासून देशात पेपरफुटीच्या घटनांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षांत देशात तब्बल ८९ पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत, ज्याचा फटका ६ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना बसला आहे. यातील ४८ परीक्षांचे वेळापत्रक बदलावे लागले, तर २२ परीक्षा रद्द कराव्या लागल्या.

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांवर निशाणा:

काँग्रेस प्रवक्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील या 'संस्थात्मक अपयशा'साठी थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरले आहे. "एकाही प्रभावी कृतीशिवाय हे मंत्रालय चालत आहे. जेव्हा एखाद्या राष्ट्रीय परीक्षेची विश्वासार्हता संपते, तेव्हा नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे," असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणावर मौन बाळगून का आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

'छात्रों की गूंज' मोहिमेची घोषणा:

विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने ३० जूनपासून ४० दिवसांच्या देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. ही मोहीम ९ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील 'संसद घेराव' आंदोलनाने संपणार आहे. पेपरफुटीच्या नेटवर्कमध्ये सामील असलेल्या मास्टरमाईंडला अटक करून कठोर कारवाई करावी आणि शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवावा, अशी मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.

 

सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/



शहर

महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *