Brave Mumbai Mother Foils Knife-Point Robbery Attempt inside Her Car!

मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!

Brave Mumbai Mother Foils Knife-Point Robbery Attempt inside Her Car!
मुंबई: माटुंगा परिसरात एका महिलेने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठी लूटमारीची घटना टळली आहे. गुरुवारी संध्याकाळी माटुंग्यातील खालसा डॉन बॉस्को परिसराबाहेर ही धक्कादायक घटना घडली.

नेमकी घटना काय? एक महिला फुटबॉल क्लासमधून आपल्या दोन लहान मुलांना घेऊन घरी परतत होती. ती कारमध्ये बसताच, एका अज्ञात व्यक्तीने अचानक कारचा मागचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. गाडीत मुलांसोबत बसलेल्या या व्यक्तीने चाकूचा धाक दाखवत महिलेकडे पैसे आणि सोन्याचे दागिने देण्याची
मागणी केली. तसेच, आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली.

 

महिलेचा धाडसी प्रतिकार: या प्रसंगी घाबरून न जाता, संबंधित महिलेने मोठ्या धैर्याने त्या आरोपीला विरोध केला आणि आरडाओरड सुरू केली. महिलेच्या या प्रतिकारामुळे आरोपी गोंधळला आणि त्याने गाडीतून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. महिलेचा आरडाओरड ऐकून आसपासचे नागरिक मदतीसाठी धावून
आले. नागरिकांनी पाठलाग करून त्या आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांची कारवाई: पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता, त्याच्याकडे दोन धारदार चाकू सापडले आहेत. आरोपीचे नाव अली बशारत अली सय्यद (वय ४०) असे असून, पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या महिलेच्या धाडसी निर्णयाचे सध्या मुंबईत सर्वत्र कौतुक होत आहे.



शहर

महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *