Relief for India: 30 Tankers Carrying LPG, LNG, and Crude Oil Successfully Cross Strait of Hormuz.

भारताला मोठा दिलासा: होर्मुझमधून ३० टँकर्स सुखरूप बाहेर; LPG, LNG आणि कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याच्या मार्गावर.

Relief for India: 30 Tankers Carrying LPG, LNG, and Crude Oil Successfully Cross Strait of Hormuz.नवी दिल्ली: २८ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक व्यापारासाठी अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या 'होर्मुझ सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) मार्गावर मोठा परिणाम झाला होता. मात्र, आता या मार्गावरून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शिपिंग मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांपैकी ३० व्यावसायिक जहाजे आता सुरक्षितपणे या मार्गातून बाहेर पडून भारताकडे रवाना झाली आहेत.

 

३० जहाजांचा प्रवास सुरक्षित, २६ प्रतीक्षेत: युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक जहाजे या मार्गावर अडकून पडली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ३० जहाजांनी हा धोकादायक मार्ग यशस्वीरित्या पार केला आहे. दुसरीकडे, अजूनही २६ जहाजे हा महत्त्वाचा सागरी मार्ग पार करण्यासाठी आपल्या सुरक्षित वेळेची वाट पाहत आहेत.

काय आहे या जहाजांमध्ये? या ३० जहाजांपैकी १५ जहाजांवर लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) आणि लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) भरलेला आहे. याशिवाय ८ जहाजे बल्क कार्गो (Bulk Cargo) वाहून नेणारी आहेत, तर उरलेली ७ जहाजे थेट कच्च्या तेलाची (Crude Oil) वाहतूक करणारी आहेत. या जहाजांच्या सुरक्षित आगमनामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मोठा दिलासा मिळाला आहे.

 

फॉरेन फ्लॅग असलेल्या जहाजांचा समावेश: अधिकारी वर्गाने दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च ते १७ जून या कालावधीत १९ जहाजांनी हा मार्ग पार केला होता. या ताफ्यात भारतीय जहाजांसोबतच परदेशी ध्वज (Foreign Flag) असलेल्या काही जहाजांचाही समावेश आहे, जी भारतासाठी इंधन आणि इतर आवश्यक वस्तू घेऊन येत आहेत.

 

सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *