बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच, भरदिवसा घडलेल्या एका थरारक आणि धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. शहरातल्या अंबाजोगाई रोडवरील एका हॉटेल परिसरात जुन्या वैयक्तिक वादाच्या कारणावरून काही जणांनी संगनमत करून एका युवकावर धारदार शस्त्र, लोखंडी कत्ती आणि रॉडने जीवघेणा हल्ला केला आहे. हल्ला करताना संशयित आरोपींनी अत्यंत हिंसक रूप धारण करत "तुला आता जिवंत सोडणार नाही," अशी थेट धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पैशांच्या व्यवहारातून आणि जुन्या वादातून गाठले
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवन संगमेश्वर फुटके (वय ३३, रा. शास्त्रीनगर, परळी वैजनाथ) हे दुपारच्या सुमारास बँकेतून सुमारे २ लाख ५१ हजार रुपये काढून बाहेर पडले होते. त्याच वेळी जुन्या वादाची कुरापत काढून आरोपींनी त्यांना राजगड हॉटेल परिसराजवळ अडवले. सुरुवातीला आरोपींनी शिवीगाळ करत पवन यांना जबरदस्तीने कॅबीनमध्ये ओढून नेले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच हा वाद अत्यंत हिंसक वळणावर गेला.
लोखंडी कत्ती आणि रॉडने सपासप वार
कॅबीनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना संशयित आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने पवन यांच्यावर धारदार लोखंडी कत्ती आणि तलवारवजा शस्त्राने थेट मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. बचावासाठी हात पुढे केला असता पवन यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले आहे. तसेच त्यांच्या पाठीवर लोखंडी रॉडने प्रहार करण्यात आले. या दरम्यान भांडण सोडवण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेले त्यांचे सहकारी सोमनाथ वाघमारे आणि मेव्हणे शंकर कौले यांच्यावरही आरोपींनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.
गुन्हा दाखल, पोलिसांकडून दोघांना अटक
या रक्ताळलेल्या थरारानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमींना तातडीने परळी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची गंभीर प्रकृती पाहता पुढील उपचासाठी त्यांना स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे. पवन फुटके यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात अनंत गणेश ढोपरे, संतोष जीवनराव शिंदे, अभिजीत गणेश ढोपरे आणि नरेश वाळके या चार जणांविरोधात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण आणि तूट राहण्याचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली!
- आजचे राशिभविष्य २१ ऑगस्ट २०२६: शुक्र देणार पैसा, लक्झरी आणि सुख-समृद्धी; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!
- पुणे: भावाला वाचवताना दोघांचा करुण अंत, पुण्याच्या दौंडमध्ये विजेचा शॉक लागून दोन चुलत भावांचा मृत्यू आई थोडक्यात बचावली!
महाराष्ट्र
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- नक्कीच पुढच्या जन्मी डॉक्टर बनेल... वैद्यकीय परीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय सूरजचे टोकाचे पाऊल!
गुन्हा
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!




























Subscribe to my channel



