Accused Arrested After Brutal Assault on Woman Govt Employee

पालघर: सरकारी महिला कर्मचाऱ्यावर भररस्त्यात कोयत्याने ८ वार; आरोपी गजाआड, धक्कादायक कारण समोर

Accused Arrested After Brutal Assault on Woman Govt Employee पालघर: पालघर शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या २८ वर्षीय महिला शासकीय कर्मचाऱ्यावर भररस्त्यात कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अमोल मुळे याला अटक केली असून, त्यांच्यातील प्रेमसंबंधातील वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नेमकी घटना: शुक्रवारी सायंकाळी ही थरारक घटना घडली. पीडित स्नेहल सावंत ही सरकारी कामावरून घरी परतत असताना, मागावरून आलेल्या अमोल मुळे याने तिच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केला. आरोपीने तिच्या मानेवर, पाठीवर, खांद्यावर आणि कमरेवर एकामागून एक तब्बल ८ वार केले. हा संपूर्ण प्रकार जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हल्ल्यानंतर स्नेहल गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळली, तर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

 

अटक आणि आत्महत्येचे प्रयत्न: हल्ल्यानंतर आरोपी अमोल मुळे याने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी पळ काढला. अटक टाळण्यासाठी त्याने स्वतःचे आयुष्य संपवण्याचे दोनदा प्रयत्न केले. त्याने आधी गळफास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दोरी तुटल्याने तो बचावला. त्यानंतर त्याने विष प्राशन केले. पोलिसांनी तपास करत असताना वरखूंटी परिसरात त्याला संशयास्पद स्थितीत शोधून काढले. विष पिल्यामुळे त्याची प्रकृती खालावली असल्याने पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून पोलिसांनी त्याला अधिकृतपणे अटक केली आहे.

वैयक्तिक वादाचा राग: मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी अमोल मुळे हे एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांत त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. याच वादाचा राग मनात धरून अमोलने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. सध्या पीडित महिला स्नेहल सावंत हिची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर बोईसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.



महाराष्ट्र

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *