22-Year-Old Man Stabs Staff Nurse to Death in Yavatmal Hospital Corridor; Accused Arrested.

यवतमाळ: आईच्या वादाचा भीषण सूड! यवतमाळमधील बंद हॉस्पिटलच्या वऱ्हांड्यात स्टाफ नर्सची गळा चिरून हत्या; आरोपीला अटक.

22-Year-Old Man Stabs Staff Nurse to Death in Yavatmal Hospital Corridor; Accused Arrested.
यवतमाळ: दत्त चौक परिसरातील श्रोत्री हॉस्पिटलमध्ये शनिवारी सायंकाळी एका स्टाफ नर्सची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?
श्रोत्री हॉस्पिटल आणि प्रसूतीगृह अनेक वर्षांपासून बंद असूनही, अर्चना भगत आणि कुसुम महादेवराव चांदेकर (वय ४५) या दोन स्टाफ नर्स तिथेच वास्तव्यास होत्या. कुसुम चांदेकर आणि अर्चना भगत यांच्यात दीर्घकाळापासून कुरबुरी आणि वाद सुरू होते. शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कुसुम चांदेकर हॉस्पिटलबाहेर पडत असताना, अर्चना यांचा मुलगा हिमांशू रवींद्र भगत (वय २२) तिथे आला. त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि त्याच रागातून हिमांशूने कुसुम चांदेकर यांच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

आरोपीला अटक:
घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करून पुराव्यांचे संकलन केले. गुन्हा केल्यानंतर पसार झालेल्या हिमांशू भगतला पोलिसांनी आर्णी बायपास परिसरातून अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने आपली आई आणि मृत नर्स यांच्यातील वादाचा बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याची कबुली दिली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *