SA vs AFG : अफगाणिस्तान शेवटच्या चेंडूवर पराभूत, दक्षिण आफ्रिका डबल सुपर ओव्हरमध्ये विजयी

दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत दुसऱ्या सुपर ओव्हरपर्यंत पोहचलेल्या सामन्यात अफगाणिस्तानवर थरारक विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं होतं. अफगाणिस्तानचा डाव या विजयी धावांचा पाठलाग करताना 19.4 ओव्हरमध्ये 187 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानला 3 बॉलमध्ये 2 रन्सची गरज होती. तेव्हा फझलहक फारुकी नॉन स्ट्राईक एन्डवर रन आऊट झाला. अशाप्रकारे सामना बरोबरीत सुटला. अशाप्रकारे 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पहिली सुपर ओव्हर होणार हे निश्चित झालं. मात्र पहिली सुपर ओव्हरही टाय झाली.

जोवर सुपर ओव्हरचा निकाल लागत नाही तोवर सुपर ओव्हर होत राहणार, असा नियम आहे. त्यामुळे उभयसंघात दुसऱ्या सुपर ओव्हरला सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेने 23 धावा केल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला 24 धावांचं आव्हान मिळालं. मात्र अफगाणिस्तानला 19 धावांपर्यंतच पोहचता आलं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे डबल सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानवर 4 धावांनी मात करत या स्पर्धेतील सलग दुसरा विजय साकारला.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *