जालना: भ्रष्ट तहसीलदाराला बेड्या! वाळू उपसा सुरू ठेवण्यासाठी ६.४० लाखांची लाच घेणारा अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात.

Ambad Tehsildar Vijay Chavan Arrested for Accepting ₹6.40 Lakh Bribe to Allow Illegal Sand Mining. 
जालना: लाचखोर तहसीलदारावर एसीबीचा 'सर्जिकल स्ट्राईक'जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.  शनिवारी (६ जून २०२६) सायंकाळी बीड एसीबीच्या विशेष पथकाने छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी सापळा रचून ही कारवाई केली.

नेमके प्रकरण काय? अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या वाळू उपशाशी हे प्रकरण संबंधित आहे. वाळू वाहतूक करणारे ट्रक आणि पोकलेन मशीनवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांनी तक्रारदाराकडे महिन्याकाठी मोठ्या रकमेची मागणी केली होती. ही रक्कम लाच म्हणून देण्यास तक्रारदाराने नकार देऊन बीड एसीबीकडे धाव घेतली. एसीबीचा सापळा आणि अटक:तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बीड एसीबीच्या पथकाने शनिवारी छत्रपती संभाजीनगरमधील चव्हाण यांच्या राहत्या घराबाहेर सापळा रचला.

तक्रारदाराने जशी ६ लाख ४० हजार रुपयांची लाच विजय चव्हाण यांच्या हाती दिली, तसे तिथे दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. या कारवाईनंतर त्यांच्या मुकुंदवाडी आणि सिडको परिसरातील मालमत्तांचीही तपासणी सुरू करण्यात आली.

वादग्रस्त कारकीर्द: तहसीलदार विजय चव्हाण हे त्यांच्या कारकिर्दीत अनेकदा वादात राहिले आहेत. यापूर्वीही त्यांना एका जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात शासनाने निलंबित केले होते. तसेच, वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेल्यावर त्यांच्यावर हल्ला होण्याचा प्रयत्न झाला होता, त्यावेळी त्यांनी स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केल्याची घटनाही चर्चेत होती.

स्वतः कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची भाषा करणारे चव्हाण आता लाचखोरीच्या आरोपाखाली अडकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *