पुण्यामध्ये एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका २७ वर्षीय तरुणीने लग्नासाठी आपल्या प्रियकराचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी थेट बीड जिल्हा गाठून या 'लेडी डॉन'सह तिच्या सात साथीदारांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी आणि नीलेश बोद्रे यांची आधीपासून मैत्री होती. तरुणीची नीलेशसोबत लग्न करण्याची तीव्र इच्छा होती, मात्र नीलेश या लग्नासाठी अजिबात तयार नव्हता. नीलेश लग्नास नकार देत असल्याने, या तरुणीने आपल्या सात साथीदारांना गोळा केले आणि त्याच्या अपहरणाचा कट रचला.
हा प्रकार पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ घडला. २७ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नीलेशला काही जणांनी रस्त्यात अडवले. त्याला बेदम मारहाण करत एका भाड्याच्या टुरिस्ट गाडीत बळजबरीने कोंडून पळवून नेले. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गाडीचा क्रमांक मिळवला आणि आरोपींचा पाठलाग केला. आरोपी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे पोहोचले असता, पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिथे धाड टाकून नीलेश बोद्रे याची सुखरूप सुटका केली.
पोलिसांनी या प्रकरणात तरुणीसह सुदाम ताठे, शेख सोहेल, देविदास पांजगे, वैभव शेळके, प्रसाद गवळी आणि सारंग काकडे या सात आरोपींना अटक केली आहे. सर्वांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. लग्नासाठी थेट तरुणाचेच अपहरण करण्याच्या या अजब गुन्ह्यामुळे संपूर्ण पुणे आणि बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
शहर
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
- मुंबई: शाळांच्या परिसरातील जंक फूड विक्रीबाबत टोलवाटोलवी खपवून घेणार नाही; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा सज्जड इशारा
- पुणे: खडकवासला आणि पानशेत धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढणार, चारही धरणांमध्ये ९५.२२ टक्के पाणीसाठा
- पुणे: धरणासाठी सर्वस्व दिले, पण अंत्यसंस्कारासाठी जागाच नाही; मृतदेह रात्रभर घरात ठेवावा लागल्याने पवनानगरमध्ये संतापाची लाट
महाराष्ट्र
- मुंबई: विरारमध्ये मन हेलावून टाकणारी घटना; बाळावरून झालेल्या वादात सासऱ्याच्या धक्क्याने खाली पडून २८ वर्षीय सुनेचा मृत्यू
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
- मुंबई: शाळांच्या परिसरातील जंक फूड विक्रीबाबत टोलवाटोलवी खपवून घेणार नाही; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा सज्जड इशारा
- पुणे: खडकवासला आणि पानशेत धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढणार, चारही धरणांमध्ये ९५.२२ टक्के पाणीसाठा
गुन्हा
- यवतमाळ: झोपेत असलेल्या महिलेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या; खळबळजनक घटनेने परिसर हादरला
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई

























Subscribe to my channel




