Three Fake Godmen Booked for Raping Minor Girl in Sangli!

दैवी शक्ती'चा दावा करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तीन भोंदूबाबांविरुद्ध गुन्हा!

Three Fake Godmen Booked for Raping Minor Girl in Sangli!
सांगली जिल्ह्यातील विटा येथील 'कडेश्वर धाम' या आश्रमात सुरू असलेला एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःला देवाची अवतार असल्याचे भासवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विटा पोलिसांनी आश्रमातील तीन भोंदूबाबांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. महेश मोहन बाबर, संकेत संदीप निकम आणि सूरज उपाध्ये अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

भोंदूगिरीचे जाळे आणि अत्याचार
आरोपींनी पीडित मुलीला शारीरिक त्रास होत असल्याचे पाहून, "संकेत निकम हा विविध देवतांचा अवतार आहे आणि तुझ्या शरीरात देवीचा संचार होतो," असे सांगून अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढले. पीडितेला पूजा आणि हवनासाठी भाग पाडण्यात आले. तसेच, "तू मागच्या जन्मी नागिन होतीस आणि संकेत बाबा नाग होता, तुमची लग्नगाठ जुळण्यासाठीच हा जन्म झाला आहे," असे अघोरी भासवून संकेत निकम याने अल्पवयीन मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार केले. या काळात आरोपींनी पीडितेच्या वडिलांकडून सुमारे ५ लाख रुपयेही उकळले.

धमक्या आणि कायदेशीर कारवाई
आरोपी सूरज उपाध्ये याने पीडितेला, "जर कोणाला काही सांगितले तर तुझे व्हिडिओ व्हायरल करेन," अशी धमकी देऊन गप्प राहण्यास भाग पाडले होते. या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर विटा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS), पोक्सो (POCSO) कायदा आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष प्रथा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



गुन्हा

राजकीय

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *