लातूर: वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'NEET-UG' पेपरफुटी प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) अत्यंत वेगाने सुरू आहे. या हाय-प्रोफाईल गैरव्यवहारात लातूरमधील प्रसिद्ध 'आरसीसी' (RCC) कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली असून त्यांच्या चौकशीतून दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या सगळ्या घडामोडींदरम्यान, आता सोशल मीडियावर शिवराज मोटेगावकर यांचा एक जुना आक्षेपार्ह व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे.
व्हायरल झालेल्या या जुन्या व्हिडिओमध्ये मोटेगावकर वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत असताना अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर करताना दिसून येत आहेत. विज्ञान आणि केमिस्ट्री (रसायनशास्त्र) विषयात अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा 'पेरिओडीक टेबल' (Periodic Table) आणि त्यातील मूलद्रव्यांचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी त्यांनी तयार केलेली एक अजब वाक्यरचना या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळत आहे.
केमिस्ट्री सोपी वाटावी म्हणून अनेक महाविद्यालये किंवा क्लासेसमध्ये मजेदार ट्रिक्स किंवा शॉर्टकट वापरले जातात; मात्र मोटेगावकर यांनी थेट राजकीय आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवल्याचे समोर आले आहे. व्हिडिओमध्ये ते विद्यार्थ्यांसमोर "ओ सानिया सेक्सी तेरी पोझ", "हाल नका रे करू फिमेलचे", "बेगम मुघलांच्या काळात सारसबागेत रमायची" आणि "सोनियाचा दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब झाला" अशा प्रकारची आक्षेपार्ह वाक्ये बोलताना आणि विद्यार्थ्यांना ती लिहून देताना दिसत आहेत.
नीट परीक्षा घोळ आणि पेपरफुटीच्या आरोपांमुळे आधीच सीबीआयच्या कोठडीत असलेल्या मोटेगावकर यांच्या या जुन्या व्हिडिओमुळे आता त्यांच्या अध्यापन पद्धतीवर आणि मानसिकतेवर तीव्र शब्दांत टीका होत आहे. कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि विद्यार्थ्यांची लूट केल्याच्या संशयासोबतच पालकांमधूनही या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शहर
- पुणे: माण-बालेवाडी मेट्रो टप्प्याला सुरक्षा आयुक्तांची मंजुरी; प्रवासी सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा
- पुणे: राज्यात आरोग्य चिंतेत वाढ: डेंग्यूचे ३,७६२ तर हिवतापाचे २,०३६ रुग्ण नोंदवले, साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू
- नागपुर: लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करून दोन कुख्यात तस्करांना अटक, साथीदाराचा शोध सुरू
- पुणे: टीईटी परीक्षा घोटाळा हा मागील सरकारच्या काळातलाच सर्वात मोठा स्कॅम, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर जोरदार पलटवार
महाराष्ट्र
- पुणे: माण-बालेवाडी मेट्रो टप्प्याला सुरक्षा आयुक्तांची मंजुरी; प्रवासी सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा
- सिंधुदुर्ग: अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सिंधुदुर्ग नगरीत विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन.
- पुणे: राज्यात आरोग्य चिंतेत वाढ: डेंग्यूचे ३,७६२ तर हिवतापाचे २,०३६ रुग्ण नोंदवले, साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू
- ठाणे: किरकोळ कारणावरून लिव्ह-इन पार्टनरच्या ७ वर्षांच्या चिमुरड्याची काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: आयपीएस बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत ६९ वर्षीय वृद्धेला १२ लाखांनी गंडवलं!
- छत्रपती संभाजीनगर: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला
- पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा
- छ.संभाजीनगर: प्रसिद्ध 'उत्तम उपहार गृह'वर FDA चा छापा, हॉटेलात पाय टाकताच नको ते दिसलं, परवाना रद्द!
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
- उत्तर प्रदेशातील: प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीला विषारी सापाकडून विसकावून संपवले; मेरठमधील हत्येचे भयानक सत्य उघड
- दिल्लीतील student protest चे पुणे कनेक्शन! 'कॉकरोच जनता पार्टी'चा शनिवारवाड्यातून आक्रमक मोर्चा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अन् वाहतुकीत बदल"
- तेलंगणा: खेळता-खेळता मोबाईलची बॅटरी तोंडात धरली अन् झाला भीषण स्फोट; १२ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत



























Subscribe to my channel



