Mumbai Police Sub-Inspector Swadesh Chavan Booked for Cheating and Assaulting Girlfriend in Warje

पुण्यात पोलिसाचेच काळे कृत्य! लग्नाचे आमिष दाखवून पोलीस उपनिरीक्षक स्वदेश चव्हाण याच्याविरुद्ध वारजे पोलिसांत अत्याचाराचा गुन्हा दाखल

Mumbai Police Sub-Inspector Swadesh Chavan Booked for Cheating and Assaulting Girlfriend in Warje पुणे: सर्वसामान्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानेच एका ३१ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. मुंबईत कार्यरत असलेल्या स्वदेश चव्हाण या पोलीस उपनिरीक्षकावर (PSI) लग्नाचे खोटे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याप्रकाने पुण्याच्या वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंधमिळालेल्या माहितीनुसार, पीडित ३१ वर्षीय तरुणी आणि पोलीस उपनिरीक्षक स्वदेश चव्हाण यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. स्वदेश याने तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. या विश्वासाच्या बळावर त्याने पीडितेसोबत तिच्या संमतीने आणि काही वेळा दबावाखाली वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

गर्भपात करण्यास पाडले भागया प्रेमसंबंधादरम्यान पीडित तरुणी गरोदर राहिली. तिने जेव्हा स्वदेशला याबद्दल सांगितले आणि लग्न करण्याचा आग्रह धरला, तेव्हा त्याने लग्न करण्यास टाळाटाळ सुरू केली. इतकेच नव्हे तर त्याने पीडितेवर दबाव आणून तिचा गर्भपात (Abortion) देखील घडवून आणला. गर्भपातानंतरही तो लग्न करेल अशी आशा पीडितेला होती, मात्र काही दिवसांनी त्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला आणि तरुणीची फसवणूक केली.

वारजे पोलिसांत गुन्हा दाखलअखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने पुण्याच्या वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपी पोलीस उपनिरीक्षक स्वदेश चव्हाण याच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपी पीएसआय स्वदेश चव्हाण याच्याविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि बळजबरीने गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पुणे आणि मुंबई पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *